बाहुत ये माझ्या
जाऊ नको दूर
मनी हुरहूर
तुझ्यापायी .....!
अशी माझी पियू
नटरंगी चाल
झाले माझे हाल
तुझ्यापायी ......!
हसू किती छान
गुलाबी ते गाल
कळले ग काळ
न्याहाळूनि .......!
दरवळ तुझी
खूपच ग न्यारी
सुगंधित प्यारी
पियू माझी ......!
तुझ्यात मी मग्न
नाही देहभान
प्रीतीचा हे गाणं
तुझ्यासाठी.....!
सांगू कसे तुम्हा
आवडते परी
आहे ती हो खरी
हृदयी माझ्या ....!
किती आणि कशी
वर्णू माझी परी
आहे ती सुंदरी
ती बावरी ......!
.........साहिल........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा