शनिवार, २५ मार्च, २०१७

गगन भरारी ....

ज्ञानाची मिळवून पदवी ,जगण्याची रीत पाहण्यासाठी
पेटून उठू हक्कासाठी ,गगन भरारी घेण्यासाठी

कला अन संस्कृतीचे संवर्धन करण्या पदोपदी झटूया
ज्ञानाची या ख्याती आता अंधारातही पोह्चुया

भांडण-तंटे आपसातले विसरून आज जाऊ
उद्याच्या पिढीसाठी नव इतिहास लिहून जाऊ

जात-धर्माच्या या बंधनातून मुक्त या समाजा करू
जातीसाठी नाहीतर मातीसाठी जगणारी माणस घडवू

नवनिर्मिती करण्या दाखवू कौशल्याची दुनियादारी
जुळून येईल मग रोजगाराची संधी दुनियेत सारी

उंच आपुले ध्येय अन उंच आपला स्वाभिमान ठेऊया
जिंकण्या सारे जग चला आपण गगन भरारी घेऊया

जिंकण्या सारे जग आपण गगन भरारी घेऊया ...!!


         © साहिल ©
© विजय वाठोरे सरसमकर ©
हिमायतनगर जि.नांदेड
9975593359

राहील फक्त आठवण ....

वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ......!


राहील फक्त आठवण ....


तुझी माझी गट्टी जमली होती जेंव्हा
तू अशीच बिलगली होतीस मला
तुझ माझ्या आयुष्यात येण
म्हणजे एक वरदानच ठरल मला
बोलताना मला तू थोडी अडखळायचीस
जेव्हा पहिल्यांदा भेटलीस मला
नुसती एकटक पाहत होतीस माझ्याकडे
मीही थोडा स्तब्ध होऊन राहिलो होतो
नजरेला नजर भिडली
अन तुझीमाझी प्रीत जुळली
तुझी प्रीत निभावण्याची
रीत कळली नाही ग मला
पण तुझी साथ असावी सदैव मला
एवढच मी मागतो ,
आठवण तशी तुझी काढावी लागत नाही
कारण तू माझ्या प्रत्येक श्वासात आहेस
आणि आज तुझा वाढदिवस म्हणून
तुझ्यासाठी सारा खटाटोप ,
भेट तर होऊ शकली नाही
पण तुझ्यासाठी तुझ्यादिर्घायुशासाठी
तुला आनंदी पाहण्यासाठी म्हणून
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .....!!
जन्मभरासाठी तुझीच साथ मिळावी हीच इच्छा ...!!



                                  ........साहिल.........
मी आजही त्याच रस्त्याच्या वळणावर उभा आहे
कारण आजही तुला मिळविण्याचा माझा मनसुभा आहे

                                   ........साहिल
खूप झाले ध्यास तुझे
अन खूप पाहिली वाट मी
तरीही ओढ मात्र तुझीच
कळेना का ...

           
                      .....साहिल

रंगात रंगुनी ...




 
ती रम्य सकाळ जेव्हा तू मला भेटली होतीस
नकळतच का होईना त्या दिवशी तू मला खेटली होतीस ..
 
दोघांचीही नजरानजर झाली मी मात्र तुला एकटक पाहतच होतो
आणि तू फक्त बोलत होतीस ,मी तुला मनोमनी सजवतच होतो
                    

                                           ..........साहिल

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...