मंगळवार, २२ जुलै, २०२५

हिमायतनगर तालुक्यामध्ये चिकनगुनियाचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर ; सरसम येथे कंटेनर सर्वे सुरु

 

 हिमायतनगर तालुक्यामध्ये चिकनगुनियाचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर  ; सरसम येथे कंटेनर सर्वे  सुरु

महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क 

हिमायतनगर (विजय वाठोरे ) - तालुक्यातील मौजे जिरोना या ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गणेशवाडी व तांडा येथे अचानक चिकनगुनिया सदृश्य रुग्ण हे 60 पेक्षा जास्त आढळून आल्याने हिमायतनगर तालुक्यामध्ये या रोगाविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिमायतनगर तालुक्यामध्ये चिकनगुनियाचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आला आहे.या संदर्भात आरोग्य विभागाकडून कंटेनर सर्वे सुरू करण्यात आला आहे. यात नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांचे रक्त तपासणी करणे. पाण्याच्या जागा स्वच्छ करणे, रस्त्यावर वाहणारे पाणी व नाल्याचे पाणी वाहते करण्यास  सांगणे. विनाकारण साचून असलेले पाणी त्याची विल्हेवाट लावण्यास आशा सेविका यांच्यामार्फत गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

  हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली आशा गटप्रवर्तक पौर्णिमा कांबळे यांच्या सोबत रविकांत माने,भोसले,आशाताई जयमाला कांबळे यांनी सरसम या गावात कंटेनर सर्वे सुरू केला आहे. दूषित पाणी व घाण यातून पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगापासून बचावण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे रक्त तपासणी करत आहेत. गावात ठिकठिकाणी रस्ते घाण झाले आहेत.तिथे पाणी साचले असल्यामुळे मच्छर झाले आहेत,यामुळे नागरिक बिमार पडत आहेत.तसेच सांडपाण्याची विल्हेवाट लावणे, नाल्या साफ करून नाल्याचे पाणी वाहते करणे, टाक्या डबके इत्यादी ठिकाणचे पाणी झाकून ठेवणे किंवा स्वच्छ ठेवणे. तसेच एक दिवस कोरडा पाळणे.याबाबत गावकऱ्यांमध्ये  जागरूकता निर्माण करत आहेत.

बुधवार, १६ जुलै, २०२५

कै.श्रीधरराव देशमुख माध्यमिक विद्यालयात शासकीय नोकरीत निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांना सत्कार

 

कै.श्रीधरराव देशमुख माध्यमिक विद्यालयात शासकीय नोकरीत निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांना सत्कार 

साईनाथ सूर्यवंशी यांची मंत्रालयात तर गजानन सुरोशे यांची नागपूर हायकोर्टात निवड 

हिमायतनगर (विजय वाठोरे ) - तालुक्यातील सरसम (बु) येथील कै.श्रीधरराव देशमुख माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी असलेले साईनाथ सूर्यवंशी व गजानन सुरोशे यांची शासकीय नोकरीमध्ये निवड झाल्याबद्दल विद्यालयामध्ये त्यांचा सत्कार समारंभ पार पडला. साईनाथ सूर्यवंशी यांची मंत्रालयामध्ये तर गजानन सुरोशे यांची नागपूर हायकोर्टामध्ये निवड झाल्याबद्दल विद्यालयाकडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

        यावेळी गजानन सुरोशे व साईनाथ सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपण केलेला अभ्यास व संघर्ष याची कहाणी सांगत प्रेरणादायी वातावरण निर्मिती केली व उच्च माध्यमिक शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षेबाबत सखोल मार्गदर्शन केले.

     अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी हे यश संपादन केले आहे. गरिबी ही शिक्षणामध्ये अडचण ठरू शकत नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे दोघं आहेत. गावासाठीच नाही तर आपल्या शाळेतले विद्यार्थी म्हणून आपल्या शाळेसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.आपल्या शाळेतील विद्यार्थी पुढे चालून यांची प्रेरणा घेऊन अशाप्रकारे यशस्वी व्हावे यासाठीच असे कार्यक्रम आयोजन करण्यात येतात.असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांनी केले.त्या दोघांचेही पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी शिक्षक चव्हाण सर, जाधव सर ढेमकेवाड सर,राऊतवार सर, कांबळे सर, मोतेवार मॅडम यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोमवार, १४ जुलै, २०२५

हिमायतनगर शहरातील नामांकित शिक्षण संस्थेतील शिक्षक चालवतात खाजगी शिकवणी वर्ग ?

 


हिमायतनगर शहरातील नामांकित शिक्षण संस्थेतील शिक्षक चालवतात खाजगी शिकवणी वर्ग ?

अबब गुरूजी तुम्ही पण......

 हिमायतनगर (विजय वाठोरे ) - शहरामध्ये अनधिकृतपणे चालणारे खाजगी शिकवणी वर्ग व बेकायदेशीर चालणारे इंग्लिश स्कूल यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यातच आता हिमायतनगर शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या गुरुजींनी चक्क माध्यमिक ते उच्च माध्यमिक पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे खाजगी शिकवणी वर्ग घेत आहेत ? शहरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेमध्ये नोकरी करताना चांगले वेतन असूनही खाजगी शिकवणीच्या माध्यमातून  पैसे कमवण्याचा मोह जर गुरुजीला नडला असेल तर इतर सुशिक्षित बेरोजगार युवकांनी काय करायचं ? या गुरुजींवर शिक्षण विभाग मेहरबान आहे का ? म्हणूनच एवढ्या धाडसाने गुरुजी खाजगी शिकवणी वर्ग घेत आहेत अशी चर्चा सुज्ञ नागरिकांतून केली जात आहे.

     हिमायतनगर शहरामध्ये बोगस,बेकायदेशीर आणि अनधिकृतपणे चालणारे क्लासेस व इंग्लिश स्कूल मोठ्या संख्येने बोकाळले असताना नामांकित शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या शिक्षकांनीही खाजगी शिकवणीच्या माध्यमातून आपले प्रस्थ शहरात मांडले असून अनेकदा या गुरुजी कडून विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करून आपल्याच खाजगी शिकवणी मध्ये प्रवेश घ्या अशी तंबी सुद्धा हे शिक्षक देतात अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. हिमायतनगर शिक्षण विभाग झोपेत आहे का  ? हिमायतनगर शहरात एवढे अधिकृतपणे धंदे चालू असताना गटशिक्षणाधिकारी मात्र मूग गिळून गप्प का बसले आहेत  ? हिमायतनगर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे व बोगसपणे चालणाऱ्या खाजगी शिकवणी वर्ग व इंग्लिश स्कूलचे  प्रकरण तापलेले असताना देखील नांदेड जिल्ह्याचा शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत असताना दिसून येत आहे ? हिमायतनगर येथील शिक्षण विभाग अशा बोगसपणे चालणाऱ्या खाजगी शिकवणी वर्गांना पाठबळ देत आहे का  ? की गटशिक्षणाधिकारी व त्यांचे अधिकारी कर्मचारी या प्रकरणांमध्ये मळून आहेत ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...