बुधवार, १९ एप्रिल, २०१७

*तु त्या काठावर* *मी या काठावर*

तुझ्यासोबत घालवलेले क्षण
काळजात माझ्या आजही
तुझी भेट होईल कधीतरी
आस मनी माझ्या आजही


*तु त्या काठावर* *मी या काठावर*
******** *साहिल* ******

लेक माझी लाडकी...


तुच माझी लाडकी लेक
शोभलीस परी तु लाखात एक....
नटखट परी आली 
सोनपावलांनी घरी
तुझ्या येण्याने आली
रौनक माझ्या दारी
गो-या गो-या पावलांची
सानुल्या नेक काळजाची
घेवुन आलीस बहार तु
गोड गोड सुखाची
भरभराट झाली घरोदारी सारी
अशी लेक माझी भाग्यवान प्यारी
सौभाग्य माझे आलीस माझ्या जीवनी
करुनी सुखाची उधळण रमलीस या मनी
दावली तुच प्रेमाची सावली
मिळाली मज स्नेहाची माऊली
परी माझी अनोखी
बनली माझी सखी
न मिळो कधी तुला दु:ख
सदैव लाभो तुज सुखाची उब
लेक माझी खरी
जणु सत्यातली परी
सदैव मिळो तिस उभारी

--------------------------------------
✍ विजय वाठोरे सरसमकर
            (साहिल)
ता. हिमायतनगर जि.नांदेड
9975593359

बाबा तुमच्या कार्याला.....

बाबा तुमच्या कार्याला
ईथे केल हो मातीमोल
तुमच्या विचारांना गेले विसरुन
अन गेला हो चळवळीचा तोल
संघटीत होऊन फक्त
तुमच्या फोटोपुढ मिरवतात
DJ गाण्याच्या तालावर
व्यसनी अंग हलवतात
तुमच्या विचारांना त्यांनी
डोक्यात नाहीतर डोक्यावर घेतलं
नाचता नाचता त्या चारचौघात
भांडण अस भर रस्त्यावर पेटलं
तुमचा फोटोला घालुन हार
तुमाला आणलं मिरवणुकीत म्होर
अन जल्लोषात जोश दाखवून
Dj पुढं धांगडधिंगा नाचती सारी पोरं


.........साहिल.......
9975593359
संसार सारा फुलला
सखे तुझ्या साथीमुळे
जीवनी प्रकाश पडला
तु वात होऊन जळल्यामुळे


✍साहिल

*मन* ..


मन मीत माझे
माझ्याशी बोलले
भेद हे खोलले
क्षणातच
क्षणाची विश्रांती
मोहाचीच माया
दावितसे छाया
बदलुन
नाती गोती सारी
मनाची किमया
सर्व मोहमाया
मनाचीच
क्षणार्धात अशी
जागवीतो अाशा
नवी अभिलाशा
हेची मन
मनाची करणी
जीवा लावे गोडी
हवीहवी थोडी
सर्वांनाच
जीवन फुलण्या
देई हेची साथ
संकटाला मात
मन देई
जीवनी आपुल्या
हसु ते खुलवी
क्षणात भुलवी
मनमीत

✍✍विजय वाठोरे सरसमकर
        ( साहिल )
          नांदेड
    9975593359
     12/04/2017
तुझ्या अन माझ्या
भावनांची गर्दी
क्षणार्धाची दर्दी 
ओसंडली.......


....साहिल
तुझ्या माझ्या प्रेमाचा
बहरला चोहिकडे प्रेमगंध
तुझ्या प्रेमाखातीर सखे मी
फुलवत असतो काव्यगंध

...साहिल
गुलाबी ओठांची तुझी
झींग माझ्यात चढली
स्पर्शाने आज तुझ्या 
प्रीत आपली बहरली

.............साहिल

युवा.......


संघर्षाची लढाई आता
तुला लढावी लागणार
करीयर पूर्ति तुझी तुझ्याच हाती 
प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार
मरगळलेली,विस्कटलेली
ही जवानी अशीच झिजवू नको
धगधगती ज्वाला तुझी
क्षणार्धात तू विझवू नको
शुन्यातुनी विश्व उभारण्याचे
बळ अन जिद्द तुझी
अशीच अविरत ठेव
भतकत्या मनाला येऊदे जरा चेव
आयुष्याच्या वळणांना
आता तूच स्वतः वळव
जगण्याचे ध्येय तुझे
स्वकर्तत्वावर मिळव
स्वप्न तुझे साकारण्या
ज्ञानाची तु तलवार घे
अडचणी या वाट्यात तुझ्या
सहून थोडे संकटांचे वार घे


........साहिल.......
✍विजय वाठोरे सरसमकर
घ्यावा श्रीरामाचा आदर्श
जीवनात होईल उत्कर्ष
सत्कारणी लागेल आयुष्य
होता श्रीरामाचा पदस्पर्श

✍ साहिल

प्रवाह माञ तुझाच ठरलेला
हात तुझा हाती मी धरलेला
आठवणीच्या या जगतात सखे
तुझ्याच प्रीतीत मी रंगलेला


.......साहिल.....
घात असा तु केलास ग राणी
आपसुक आले डोळ्यात पाणी
अधुरीच सोडलीस आपली प्रीत
जगण्याची इच्छा राहिली ना मनी


.......साहिल.........
मन उधान उडत 
धुंद प्रेमाच्या भरात
काय सांगू तुला आता 
धडकी भरलीय उरात


.......साहिल

शब्दांचे मोती


शब्दांचे मोती जमवीत होतो
नाव थोडकेच कमवीत होतो
अपेक्षा फक्त शब्द्साठ्याची 
शब्दानेच मन जुळवीत होतो 

-------------------------------------
साहिल
सोडुन मला जाताना ती
मन माझ तीळ तीळ तुटत होतं
सखीचा हात दुस-याच्या हातात बघुन
तेही आतल्या आतच घुसमटत होतं


✍साहिल
उघड आता दार सजनी
तु नको करुस बहाणे
तुझ्यासाठी मीही आता
लिहीन नविन तराणे

.............साहिल

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...