शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

यातनांच अस्तित्व ........

यातनांच अस्तित्व ........



सये
आजही तुझ्याच विरह यातनेत
स्वताला सावरतो ग मी
तुझ्या त्या धाडशी प्रवृतीस
आजही गुणगुणतो ग मी

तुझ्या या यातनाच
खूप प्रिय वाटतात ग आता
सायेच्या प्रीतीवर सर्वच जीव लावतात ग
पण या यातनांना असते वेगळ्या अस्तित्वाची गाथा


तू,तुझा तो लडिवाळपणा
तुझ्या प्रत्येक आठवणी आज खूप छळतात ग मला
या जगावेगळ्या नात्यात प्रीतीच्या
प्रेमापेक्षा जास्त यातनाच मिळाल्या ग मला

तरीही मला याचे दु:ख किंवा
थोडीही खंत नाही तू सोबत नसल्याची
कारण आता सवयच झाली ग मला
तुझ्या या अप्रतिम अशा यातनेसोबत जगण्याची

तूच नाही जाणत ग हाल जीवाचे
बाकी हे जग मला ‘वेडा’ च आहे म्हणतात न्यारा
पण या जगास काय माहित ग
वेड लावलेल्या त्या वेडीस मिळवण्याचा हा खटाटोप सारा !

    विजय वाठोरे सरसमकर
      साहिल
    हिमायतनगर जि.नांदेड
          ९९७५५९३३५९ 

💚💚 बोलण आज माझ्या पीयुच..... 💚💚

💚💚 बोलण आज माझ्या पीयुच..... 💚💚





बोलण आज माझ्या पीयुच
थोड अजबच भासल !
शब्दांसवे माझ अन तीच
नात तुटल्यागतच वाटल!


नात होतच एक ते निखळ मैत्रीच
तेही आज संशयास्पद भासल,
बहरत आलेल्या या मैत्रीत
कुणाच्यातरी नजरेचा तीर  वाटल !


असल्या तीरांना तर दररोजच सहतो मी
पण आजचा तीर काळजात रुतल्यागत भासला !
दररोजच्या सवयीप्रमाने भेटनारी ती
आज न भेटल्याने श्वास अगदी तुचल्यागत वाटला !


या ना त्या कारणाने सतावणारी ती
आज  अचानक  मला ती  अनोळखी का भासली ?
पुन्हा पुन्हा 'चल चल 'म्हणुन खिजवनारी ती
आज अचानक भेदरल्यागत का वाटली ?



                                         कवी :-  विजय वाठोरे सरसमकर
                                         ( साहिल ) 👑
                                         हिमायतनगर जि.नांदेड
                                         9975593359
                                         19-08-2016

नाती ........

नाती ........



नाती जोडण्याची किमया हि न्यारी
क्षणात दु:ख नि क्षणात सुख सारी

कधी बनाव लागतं दिव्याच्या वाती
झुगारून बंधना बनाव लागत जीवनसाथी

खळखळत्या पाण्यासम मोहवते हि कहाणी
मग नाती जपण्यातच सारून जाते ही जवानी


नसते रूढी आणि परंपरांच्या गुंत्यांची जाण
असते ती फक्त हृदयीच्या स्पंदनांची आण

बनून धीर कधी बनून प्रेरणा
अंतरीचा दिलासा तार कधी करते प्रतारणा

या नात्यांच्या दुनियेत मोठा ना लहान
जपलेली नाती असतात सदैव महान


                                      कवी :- विजय वाठोरे सरसमकर
                                           ( साहिल )  
                                     हिमायतनगर जि.नांदेड
                                      मो.न.९९७५५९३३५९ 

उमलती कळी.....

उमलती कळी.....



आहे ती एक
उमलती कळी,
जीच्यामुळे जूळतात
माझ्या कवितेच्या ओळी !

कळी ती माझी
तीच सौंदर्य जणू सुवर्ण,
जीव ओवाळीते माझ्यावर
तीच्याविना तर जीवनच अपुर्ण !

तीला व्यक्त करण्याचा
माझा हा छोटासा प्रयत्न
मोठ्या मुशकीलीन मिळालय
मला हे मौल्यवान अस रत्न

तीची प्रित म्हणजे
प्रेमाच्या गुंत्यात गुंफत जाणार जग
लक्ष खिळवुन ठेवणारी ती
तिच्यातच मी हरवुन जात असतो मग

होत असते नाराज जेव्हा
मग घेवुनी तीचा हातात हात
देवू करतो मी तीला
सदैव जन्मभराची साथ !


                                   विजय वाठोरे सरसमकर
                                   (साहिल )
                                   हिमायतनगर जि.नांदेड
                                   9975593359

पुन्हा मला तुझी आठवण येईल ...

पुन्हा मला तुझी आठवण येईल ...



आता पुन्हा जेंव्हा पाऊस येईल
तेंव्हा पुन्हा मला तुझिओ आठवण येईल

तू गेलीस अशी कि,
आता कुठे येशील परतुनी
चंद्रही फिका पडलाय
तुझ्याविण गल्लीही झाली सुनी !

पाऊस आला कि
पावसात भिजण्याची सवय तुझी जुनीच
पावसात भिजताना पाहून
तुला जेवढं  मनात साठवाव तेवढं कमीच !

सहवास तुझा होता असा कि
तुझा तो जिव्हाळा पुन्हा पुन्हा मिळवावा
तुझा तो स्वभाव गन न्यारा
माझ्या या कवितेत पुन्हा पुन्हा जुळवावा !

                                                             विजय वाठोरे सरसमकर
                                                              हिमायतनगर
                                                             ९९७५५९३३५९

कळतच नाही ...........

कळतच नाही ...........


बाहूत तुझ्या मी हरखून जातो
वास्तवाच भानच राहत नाही
घेउनी नभात उंच भरारी
वास्तवाच्या भूवर कस उतरायचं कळतच नाही


बाहूत तुझ्या मी एकरूप होतो
मग आनंदाला पारावार उरत नाही
व्यक्त न केलेल्या भावना सांगाव्याशा वाटतात
पण मनातच ठेवाव्या की ओठांवर आणाव्यात कळतच नाही

मला पाहून जेंव्हा तू लाजतेस
मग परीत अन तुझ्यात अंतरच उरत नाही
तू हसतेस तेंव्हा माझ्या श्वासांची स्पंदने
तुझ्याच भोवती रुंजी का घालतात कळतच नाही

चेहर्यावर हसू उधळणारा मी
उगाचच रडण्याचा प्रश्नही उरत नाही
तुझा निरोप घेतांना
ओठावर हसू आणावं की डोळ्यात अश्रू कळतच नाही .


                     विजय वाठोरे सरसमकर
                     हिमायतनगर 

आठवण नक्कीच असेन....

आठवण नक्कीच असेन....


तूच तर आहेस .....

तूच तर आहेस .....


स्वप्नातही स्वप्न कुठे 
झोपेतही झोप कुठे 
तूच तर आहेस 
तूच तर आहेस ....!! १ !! 

अस काही चालावं माझा प्रवास व्हावास तू 
चालनही तुझ्यापासून सुरु आणि सीमाही तू 
बघ पडताळून मनास या यात असशील तूच तू 
मी संशयाचे ढग असेल तर विश्वास असशील तू 
माझ्यातही मी आहे कुठे 
माझ्यातही मी आहे कुठे 
तूच तर आहेस 
तूच तर आहेस ....!! २ !!


असे काही स्वप्न दे तू झोपहि उडेल माझी 
काही कारण दे अशी जी रात्र जागवेल माझी 
अशी दे निशाणी काही मी फक्त तुझाच राहीन 
हातात त्या रेषा दे माझ नशिबाच बदलून जाईन
ओठांवर शब्द कुठे 
ओठांवर शब्द कुठे 
तूच तर आहेस 
तूच तर आहेस .....!! ३ !!


                  विजय वाठोरे सरसमकर
                   ९९७५५९३३५९  

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...