बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

दणका... दणकाकार कवी रमेश पंडित




दणका 

आजच कळलं बाप्पा मला 
उद्या शिंदे साहेब नांदेडला येणार हात
आणि माग सांगल्या प्रमाण
वाढोण्याला दोन एमआयडीस्या देणार हात...

परचाराच्या काळा मधी..
दोन - बावांचे हात वरी केले
आण मंदिराच्या पटांगणा मधी
एमआयडीसीचे आश्वासन देले 

शालू बी नाई शांता बी नाही 
आता सांगू का पुढच नाव...
बोलावं तसं तोलावं बघा 
खरं हाय की नाही बाबुराव 

कवी रमेश पंडित, हिमायतनगर 
7276143358

दणका... दणकाकार रमेश पंडित

 



दणका


महाराष्ट्र केसरीचा थरार 

उभ्या जनतेने पाहिला..

लबाडाने लुटले रान..

शिवराज मात्र उपेक्षितच राहिला 


आखाडा राजकारणाचा की कुस्तीचा 

दोन्हीही सारखाच होता 

न्याय देणारे ही प्रसन्न होतात

हातात लक्ष्मी येता....


आम्ही उघड्या डोळ्याने पाहिली 

असत्याने केलेली मात....

म्हणूनच शिवराज ने घातली 

या भ्रष्ट व्यवस्थेवर लाथ 


कवी रमेश पंडित 

हिमायतनगर 

7276358143

ठसका... ठसकाकार विजय वाठोरे


 


 ठसका 


तोडून पुतळे आता ते फक्त 

पसरवतात दुहीचा वारा आहे 

आंबेडकर कधीच न संपणारी 

प्रखर विद्रोही विचारधारा आहे 


संपवू न शकले ना संपवू शकणार कोणी 

आंबेडकर हा रुबाबच न्यारा आहे 

सोडून नाव त्यांचे हालत नाही पानही 

आंबेडकर विद्रोहाचा चढलेला पारा आहे 


नुसताचं बहुजनांसाठी नाहीतर 

सर्वांसाठी तो विचार प्यारा आहे 

त्याशिवाय नाही कल्याण कोणाचे 

म्हणूनच बापाचा देश सारा आहे 


बाबासाहेब न कळलेल्या बांडगुळांना

स्फ़ोटक ठसक्याचा मारा आहे..

152 देशात साम्राज्य असलेला 

आंबेडकर वादळ वारा आहे


- विजय वाठोरे, हिमायतनगर नांदेड 

- 9975593359

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...