बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

ठसका... ठसकाकार विजय वाठोरे


 


 ठसका 


तोडून पुतळे आता ते फक्त 

पसरवतात दुहीचा वारा आहे 

आंबेडकर कधीच न संपणारी 

प्रखर विद्रोही विचारधारा आहे 


संपवू न शकले ना संपवू शकणार कोणी 

आंबेडकर हा रुबाबच न्यारा आहे 

सोडून नाव त्यांचे हालत नाही पानही 

आंबेडकर विद्रोहाचा चढलेला पारा आहे 


नुसताचं बहुजनांसाठी नाहीतर 

सर्वांसाठी तो विचार प्यारा आहे 

त्याशिवाय नाही कल्याण कोणाचे 

म्हणूनच बापाचा देश सारा आहे 


बाबासाहेब न कळलेल्या बांडगुळांना

स्फ़ोटक ठसक्याचा मारा आहे..

152 देशात साम्राज्य असलेला 

आंबेडकर वादळ वारा आहे


- विजय वाठोरे, हिमायतनगर नांदेड 

- 9975593359

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...