शौचालय बांधु घरोघरी
सोडुन देऊ हो हागंदरी ...
नकोच जाणे उघड्यावर
परसाचा तांब्या उचलुनी
स्वच्छतेचा करुनी निर्धार
रोगराई देऊ हाकलुनी
उन्नती होईल आपलीच
संडास बांधुनी सोयीयुक्त
एकी करु सर्वजण आता
गाव करु हागंदरीमुक्त
शौचालय घरी बांधण्यास
करु नका आता टाळाटाळ
घेवु विडा हाती स्वच्छतेचा
नका होऊ देऊ हा विटाळ
दररोजच्या जाचातुनी या
स्त्रिचा हा थांबवु अपमान
आया बहिनींना या आता
मिळवुन देऊ हो सन्मान
परसाकड जाता शौचास
पायाखालुन धामीन गेली
बघूनीया त्यास घाबरुनी
आजी माझी धसकीन मेली
अजुणी नको हा घातपात
म्हणुन बांधु हो शौचालय
नको दुर्गंधी नको तो वास
बांधु चला या हो शौचालय
शौचालय बांधु घरोघरी
सोडुन देऊ हो हागंदरी...
✍विजय वाठोरे सरसमकर
( साहिल )
9975593359
हिमायतनगर जि.नांदेड
दि: 04/01/2017
==================================================================