नाही ना समजलो भुललो तुजला
आता तुही साथ देशील का ग मला
आता तुही साथ देशील का ग मला
तुला मिळवणं हे एक धेय माझं
तुझ्या ह्रदयात राहणं जीवन माझं
तुझ्या ह्रदयात राहणं जीवन माझं
आशेने प्रेमाच्या मी बेधुंद होत गेलो
प्रितीच्या पहील्या पावसात मनसोक्त भिजत राहिलो
प्रितीच्या पहील्या पावसात मनसोक्त भिजत राहिलो
तुजवीन मन रमेना ते तुलाही का कळेना
तुझ्या प्रेमाच्या पावसात चालणं मलाही आवडेल ना..
तुझ्या प्रेमाच्या पावसात चालणं मलाही आवडेल ना..
तुच सवंगडी तुच माझी राधा
तुझ्याचसाठी बनलो आज मी शाम साधा
तुझ्याचसाठी बनलो आज मी शाम साधा
तुझाच प्रेमरंग बरसत राहीला माझ्यावर
खरचं आता तुही प्रेम करशील का ग माझ्यावर ?
खरचं आता तुही प्रेम करशील का ग माझ्यावर ?
नाही ना समजलो भुललो तुजला
आता तुही साथ देशील का ग मला ?
आता तुही साथ देशील का ग मला ?
( साहिल )
9975593359
हिमायतनगर जि.नांदेड
दि:- 01-01-2017
===================================================================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा