त्याची राधा तर नाही होऊ शकली ती
म्हणून त्याची मीरा होऊन जगतेय !! धृ !!
तिला कळून चुकलंय
तो काही आता तिचा नाही राहिला
तरीही ती मनापासून प्रेम करतेय
त्यानं जरी प्रेम करत नाही म्हणलं
तरीहि ती आजही त्याच्याच नावाचा जप करतेय
तो तिला मुळीच प्रतिसाद देत नाही
तरीही ती त्याचा नाद सोडत नाही
आयुष्य सार त्याच्या नावानं उधळून टाकलंय तिने
त्याला त्रास होईल असं ती कधीच वागत नाही
तिच्या बोलण्यात सतत त्याच्या असण्याचा अनुभव
अन त्याच्या सवयींचा परिणाम दिसून येतो
त्याला कळलंही असेल वा नसेल पण
ती त्याच्याच आठवणीत हरवलेली दिसून येते !
त्याची राधा तर नाही होऊ शकली ती
म्हणून त्याची मीरा होऊन जगतेय ......
विजय वाठोरे सरसमकर
(साहिल)
हिमायतनगर जि.नांदेड
दि : 07/01/2017
===============================================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा