===============================================================
आजची पिढी संस्कारक्षम आहे का ?
स्वच्छ भारतासाठी माझे योगदान आणि अपेक्षा ...
आजची पिढी संस्कारक्षम आहे का ?
=====================================================================
दिनांक ३१/१२/२०१६ रोजी**
व्यसन म्हटलं कि,अगोदर आपल्या डोळ्यासमोर कुणीतरी दारू प्यायलेला ,सिगारेट वडायलेला , तंबाखू खाणारा ,पुडी खाऊन नको तिथे पचकन थुकण्यार्यांची प्रतिमा ये ते . पण व्यसन हे दारूचे असो,सि गारेटचे असो किंवा अन्य कोणत्या ही प्रकारचे असो त्याचा आपल्या शरीरावरआणि मनावर विपरीत परिणा म झाल्याशिवाय राहत नाही.शरीर हळुहळू कमकुवत होत जातं.

==============================================================
मोबाईलमुळे पत्र खरेच हरवलेय का ?*
पूर्वी पत्र म्हणलं कि एक वेगळीच झलक पाहायला मिळायची,पोस्टमन घरी आला कि आतुरतेन त्या पत्राची चौकशी केली जायची.खास करून प्रेमी युगिलांसाठी ती एक पर्वणीच होती .कुणी पाहुण्याचं पत्र आलं तर घरातली सारीच अगदी आवडीने एकत्रित वाचत बसायचे.कोण काय करतंय ,हाली-खुशाली सारं काही पत्राद्वारे कळायचं .
पण कुणाचा मृत्यू झाला तर मात्र पत्राद्वारे कळवलं तर वेळेवर जाण व्हायचं नाही .
पण म्हणतात ना चांगल्या गोष्टींना लवकरच नजर लागते ....
याप्रमाणे पत्राचहि असच झालं सध्याच्या संगणक युग व नवीन तंत्रज्ञानामुळे पत्र लोप पावत आहे .
पत्र लिहायचं सोडून द्या पण आता तर पत्र हे नाव सुद्धा ऐकायला मिळत नाही.तरीही फक्त आपल्या कामापुरती म्हणून स्पीड पोस्ट किंवा दस्तावेज घेण्या-देण्यासाठीच वापर दिसून येतो.सध्या या मोबाईल मुळे तर पत्र व्यवहार पार बंदच झाल्यासारखा झालाय.
मोबाईल मधील बदलते नवनवीन तंत्रज्ञान आणि प्रगत व्हर्जन्स यामुळे प्रत्येक व्यक्ती अनेकांशी सहजच संपर्क साधू शकतोय.कोणता कार्यक्रम राहिला,त्याबद्दल शुभेच्छा देणं किंवा आमंत्रण ,निमंत्रण यासाठी फक्त आता एक कॉल केला जातो.फेसबुक , व्हाट्सअप ,मॅसेंजर , व्हिडीओ कॉलिंग आणि अश्या बऱ्याच सुविधांमुळे पत्राच नावच कुठं सापडत नाही.
मोबाईल मधील खूप साऱ्या सुविधांमुळे मोबाईल खूप लोकप्रिय ठरलाय आणि पत्र कालबाह्य झालय .
पूर्वी पत्र लिहायचं म्हणलं तर स.न.वि.वि. साष्टाग नमस्कार , अश्या शब्दांनी पत्राची सुरुवात व्हायची ,पात्रात प्रेमाची भाषा असायची.प्रेमी युगिलांचें तर संभाषणाच एक मुक्त व्यासपीठ होत.कधी कोणता पात्र कुणाच्या हाती जाईल याची भीती सतत असायची सर्व प्रेमींना ..आता हे सर्वच बांध झालंय. अन आता मोबाईल वर sms , व्हाट्सअप ,फेसबुकवर हाय हॅलो करतात सर्वच.पूर्वीसारखी मान देणारी भाषा आता ऐकायला आणि वाचायलाही मिळत नाही.
आज फक्त पाठ्यपुस्तकातच नावारूपाला उरलेलं आहे पत्र.आणि विद्यार्थी हि परीक्षेपुरतं पत्र लिहिणं जाणतो कि नाही याचाहि संशयच आहे.कारण प्रगत मोबाईल मुळे त्यावर खूपच परिणाम झालाय .मोबाईल वरूनच आता सर्व कामे होऊ लागली .एखादे कागदपत्र पाठवायचे असेल तर काढला फोटो कि ई-मेल वर किंवा व्हाट्सअप वर पाठवला जातो.आणि तोही क्षणार्धात पोहोचतो .मोबाईल च्या अश्या वापरामुळे आपल्याला म्हणता येईल कि पत्र खच कुठंतरी हरवलाय..
लहानपणी मामाच पत्र हरवलं असा खेळ खेळायचो आम्ही आणि आता लहान मुलांना पत्र हरवलं पत्र हरवलं म्हणून खेळ खेळावा लागेल कि काय असं वाटतं.
विजय वाठोरे सरसमकर
(साहिल)
९९७५५९३३५९
हिमायतनगर जि.नांदेड
======================================================
एक सुंदरस प्रेम पत्र ......!
मला नाही जमत ग
तुझ्यासारख सतत दु : खी राहण
मी दु : खातही हसरा चेहरा ठेवत असतो
कारण मी दु : खी राहिल्याने तू पण दुखी होशील ,
आणि हे मला कधीच बघवणार नाही .
तुझ ते जीवाची घालमेल करण
सर्वस्वी काही माझ्यासाठी मानतो मी,
तुला अन तुझ्या प्रेमाला जाणतो मी ,
पण सर्व काही आपल्याच मनासारख
होण हे कधीच शक्य नसतं .
माझा विश्वास नाही ग नशिबावर
पण तुझ्यावर विश्वास एवढा आहे कि
अगदी स्वतावरही नाही असा .
तू म्हणायचीस न कि आयुष्यभर साथ
देशील का ? मला धोखा तर देणार नाहीस ना ?
मी तेव्हाच जाणल होत तुझ ते हळवं मन !
मग खरच कळालं तेव्हा मला
आणि तेव्हापासूनच करतो ग मी प्रेम तुझ्यावर $
पण माझी प्रेम निभावण्याची रीत थोडी न्यारीच ग
त्यासाठी तुला काही काळ दूर रहावही लागेल .
तुला आज सर्व काही खर सांगाव म्हणून आज पेन
उचलला आणि जे मनात होत ते सर्व इथे उतरवतोय .
माझ्या आतापर्यंत च्या वागण्या ने किंवा बोलल्याने तुला
दु : ख त्रास झाला असेल तर मला तू कृपया माफ कर !
आणि हो खर सांगायचं म्हटलं तर
आपल आयुष्य आज आहे तर उद्या नाही
म्हणून मी तर प्रत्येक क्षण आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो ,
तसा तुही करावा ,
तुला हे जमणारच नाही हे माहिती असताना देखील माझा हा तगादा .
तुझ्यात माझी हि सवय बानण्याचा माझा हा प्रयत्न !
तुझी उगाचच खोडी काढून तुला चिडवण
जरूर आवडत मला ,पण तुला सतावण
आणि दु : खी करण नाही आवडत ग मला !
आज काय झालं कुणास ठाऊक ?
प्रत्येक वेळेस मी तुझ्यावर कविता करतो ,
पण आज शब्दही जुळत नाहीत
म्हणून म्हटलं लिहाव थोडस मनातलं !
तुझाच .........
साहिल
==================================================================
मैत्री .......
4) जाताना ती देवून गेली आठवणींच जहर .......
5) ** आई-वडील आणि वृद्धाश्रम ...... **
साहित्य काव्यगंध आयोजित ...
आता सोसायचं बळ नाई र लेका माझ्यात
तुझ्या हरकतीतून अन बोलण्यातून
सार काही मला कळलंय
माझ्यामुळे होतोय तुला त्रास
अन मी झाले आता भुईला भार
म्हणून चाललेय तुझं सोडून सार
नात्या-गोत्यांच्या या
बंधनातून मुक्त होऊन
माझं म्हणायचं असं काही
तू ठेवलंच नाहीस आता
म्हणून चाललेय तुझं सोडून सार
भेटावं वाटलंच तर ये
भेटेल मी कोण्यातरी वृद्धाश्रमात
अशीच आपलं जीवन जगण्यासाठी
कुटके मोडत असेन मी वृद्धाश्रमात
तू दिलेल्या दुःखाचं
मी बांधलाय आता गाठोडं
अन त्यांना जाता जाता
देईन मी नदीत सोडून
खूप काही आशा होत्या रे अजून
अन अनंत स्वप्न रंगविली होती
बहुतेक ईश्वराला मान्य नसतील
म्हणून चाललेय तुझं सोडून सार .....
म्हणून चाललेय तुझं सोडून सार ......
आजची पिढी संस्कारक्षम आहे का ?
आजच
युग हे संगणक
युग आहे आणि
आजची पिढी हि
तितकीच बुद्धिमान व चाणाक्ष
आहे.आजची पिढी
याविषयी वास्तवता खूपच भयानक
आहे .म्हणून या
बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार
नाही .आज समाजात
जे काही घडत
आणि घडणार आहे
या सर्व बाबी
फक्त आजच्या पिढीवर
निर्भर आहे.यामुळे
आजची पिढी हि
संस्कारक्षम आहे असं
मला तरी वाटत
नाही .
आजच्या पिढीतील कित्येकजण
व्यसनेच्या अधीन गेले
आहेत. भारत देश
हा तरुणांचा देश
म्हणून संबोधला जातो. पण
जर तरुण मोठ्या
प्रमाणावर व्यसनाच्या आहारी जात
असेल तर कोणत्या
प्रकारे त्या देशाची
प्रगती घडू शकेल? यासाठी
आवश्यकता आहे ती
संस्कारांची.भारतीय संस्कार हे
खूपच वाखाणण्या जोगे
आहेत.कारण परप्रातीय
आपल्या संस्कृतीचे जोपासना करताना
दिसून येते. आणि आपली
आजची पिढी हि
पाश्चिमात्यकरणाच्या अनुकरणामुळे नीतिमूल्यं पायदळी
तुडविताना दिसत आहे.
यासाठी माध्यमे कारणीभूत आहेत.लोकमान्य टिळकांनी ज्या
उद्देशांने सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात
केली, त्याच उद्देशाला
आजची युवा पिढी
DJ लावणे, वर्गणीसाठी वाद घालणे
यामुळे गालबोट लावत आहे.
या विनाशरूपी प्रवृत्तीला
आळा घालण्यासाठी भारतीय
संस्कृतीचे पालन करणे
गरजेचे आहे.
आजची पिढी
संगणक, टॅब, स्मार्ट
फोन इत्यादी आधुनिक
उपकरणांच्या आहारी इतकी गेलेली
आहे की, त्यांना
वाचन, गायन, मैदानी
खेळ आणि त्या
माध्यमातून विकसित होणारी बुद्धी,
घडणारे मन अन्
शरीर यांचे महत्त्वच
राहिलेले नाही.फेसबूक’,
‘ट्विटर’, ‘व्हॉट्स अॅप’ यांच्या
आहारी गेल्यामुळे वाचनास
वेळ नसणारी आजची
मुले.अयोग्य कृतींना
आई-वडिलांकडून दिल्या
जाणार्या सकारात्मक प्रतिसादामुळेच आजची
पिढी बिघडत चालली
आहे. सध्या शाळा
आणि महाविद्यालये यांमध्ये
करावे लागणारे विविध
प्रकल्पही ‘सायबर कॅफे’मध्ये
जाऊन वेगवेगळ्या संकेतस्थळांवरून
माहिती शोधून पूर्ण होतात.
अनेकांच्या संदर्भात ज्ञानार्जन करण्यापेक्षा
केवळ इकडची माहिती
तिकडे घेणे आणि
गुण मिळवणे, असे
घडत आहे.संस्कार
असलेले कार्यक्रम सध्याच्या पिढीला
आवडतच नाहीत..आणि
आवडते तर काय
म्हणे ..यो यो
हनी सिंग ,हिप
हॉप,DJ गाणे सतत
हेडफोन कानात लावून ऐकत
बसने.दिवसभर कानात
‘इअर फोन’ घालून
आधुनिक गाणी ऐकल्याने
होणार्या दुष्परिणांमापासून अनभिज्ञ असलेली आजची
मुले.संगणक आणि
मोबाइल यांवरच
सर्व सोयी उपलब्ध
असल्याने कामचोरपणा आणि आळशी
वृत्ती बळकावत चालली आहे.
असते. पूर्णवेळ कानात
‘इअरफोन’ घालून आधुनिक गाणी
ऐकण्यातच त्यांचा वेळ जातो.
कुटुंबातील फुटाफूट झाल्यामुळे आजी-आजोबांकडून मिळणारे संस्कार
हे आजच्या पिढीला
माहीतच नाहीत .विभक्त कुटुंब
पद्धती मुळे आदर,समानता हि मूल्य
आजच्या पिढीला कळतच नाहीत
.मुलांचे आजचे वेळापत्रक
इतके व्यस्त असते
की, त्यांची स्थिती
केवळ स्पर्धेतील घोड्यांसारखी
झाली आहे. शाळा,
अभ्यास आणि शिकवणी
यांतच अधिक वेळ
जात असल्याने मिळणार्या
रिकाम्या वेळेत संगणकीय खेळ
व मोबाइलला वरील
खेळ किंवा फेसबुक,व्हाट्स अप यात
गुंतून रहातात. त्यामुळेही मैदानी
खेळ मागे पडले
आहेत.
मुलांना योग्य मार्गदर्शन
करून या उपकरणांचा
योग्य उपयोग शिकवणारे
मार्गदर्शक, तसेच दिशादर्शक
आज आपल्याला त्यांना
द्यायला हवेत. केवळ विचारसरणी
पालटून आपण समाज
घडवता येऊ शकणार
नाही.लहान मुले
ही ओल्या मातीच्या
गोळ्यासारखी असतात. त्यांना घडवू,
तशी ती घडतात.
‘त्यांना घडवण्यासाठी आधी स्वतःला
घडायला, म्हणजे पालटायला हवे’,
हे पालकांनी जाणायला
हवे. केवळ शाळा
आणि महाविद्यालये यांतील
शिक्षकांवर अवलंबून न रहाता
प्रत्येक पालकानेच आपल्या मुलासाठी
झटले पाहिजे. त्याचा
शिक्षक, मित्र आणि मार्गदर्शक
बनले पाहिजे.त्याच्यातील
गुणांचा विकास करून त्याचा
उपयोग योग्य प्रकारे
करवून घेण्यासाठी पालकच
हवेत.
आत्महत्या अथवा प्रेमप्रकरणांच्या
पाठीमागे न धावता
समाजामध्ये क्रांती घडवून आणण्याचे
धाडस केले पाहिजे.ऐशो-आराम
म्हणजे तारुण्य नव्हे याचे
भान ठेवून नावीन्य
शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करावा.कोणत्याही कामात गाफीलपणा
न दाखवता मोठय़ा
धैर्याने एकजूट केल्यास आजची
युवा शक्ती हीच
राष्ट्रशक्ती ठरून भारत
महासत्ता बनण्यास मदत होईल.समाजाला बळकट करण्याचे
सामर्थ्य महिलांमध्ये असल्याने महिलांनी
आजची युवा पिढी
सुदृढ व संस्कारक्षम
बनविण्याकरिता पुढाकार घेतला पाहिजे.
मुलांचे कौतुक करत बसण्यापेक्षा
मुलांवर चांगले संस्कार करून
त्यांना चांगला आहार व
चांगली दिशा दिली
पाहिजे.
आजच्या पिढीला संस्कारांची
खूप गरज आहे
त्यासाठी पालकांनी स्वता तसे
संस्कार आपल्यात बाणवून नंतर
आपल्या मुलांना लहानपणापासून त्यात
उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे
.तेंव्हा कुठे आजची
पिढी हि संस्कारक्षम
होण्यास सुरुवात होईल.आणि
आजची पिढी संस्कारक्षम
झाली तर आपल्या
भारताला प्रगत व्हायला वेळच
लागणार नाही.
विजय वाठोरे
सरसमकर
हिमायतनगर नांदेड
========================================================
स्वच्छ भारतासाठी माझे योगदान आणि अपेक्षा ...
भारत एक
विविधतेने नटलेला देश,पण
आपल्या या विविधतेने
नटलेल्या देशात स्वच्छ आणि
स्वच्छता याविषयी अजूनही जागरूकता
झालेली दिसत नाही.यासाठी अनेक संतांनी
आणि समाज सुधारकांनी
वेळोवेळी स्वच्छतेविषयी जागरूकता करण्याचे काम
केले.बऱ्याच वेळा
स्वतःपासून स्वच्छता सुरु केली,आणि समाजासाठी
स्वच्छतेसाठी सतत झटत
राहिले .
आज स्वच्छता
हा खूपच महत्वाचा
घटक बनलाय .स्वच्छतेसाठी
मी प्रथम माझ्यापासून
सुरुवात केलीय .माझ्या स्वतःच्या
घरापासून ते ऑफिस
पर्यंत ,शाळेपासून ते कॉलेज
पर्यंत , सर्वतोपरी मी स्वच्छता
ठेवण्याचा प्रयत्न करतो.प्लास्टिक
पिशव्या असो कि
कोणताही कचरा असो
त्यासाठी योग्य ती उपाय
योजना करत असतो.स्वच्छतेविषयी कविता ,लेख लिहून
स्वच्छते विषयी जनजागृती ,प्रबोधन
करत असतो आणि
करत राहीन. सध्या
चालू असलेल्या स्वच्छ
भारत अभियानाचे स्वागतच
करायला हवे .मोदीजींनी
सुरु केलेल्या या
चळवळीस थोडा का
होईना पण चांगला
प्रतिसाद मिळाला.बऱ्याच खेड्यापाड्यात
जाऊन आमच्या कॉलेज
तर्फे जाणाऱ्या स्वच्छता
अभियानात माझा हिरिरीचा
सहभाग असायचा ,आणि
आताही आहे .
स्वच्छता म्हणजे फक्त
आपले आपणच स्वच्छ
राहणे असे नाही
तर आपल्या आजूबाजूचा
परिसर व सार्वजनिक
ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी हातभार
लावणे.कचरा ,शौचालयाची
व इतर कोणत्याही
स्वच्छतेविषयीच्या जनजागृती करणे खूप
महत्वाची आहे,जल
प्रदूषण ,घन प्रदूषण
या सर्व अस्वच्छेपायी
उदभवलेल्या समस्याच आता आपल्या
सर्वांसाठी खूप धोक्याच्या
झाल्या आहेत.
यासाठी सर्व स्थरावरून
सहकार्य करण्याची गरज आहे.
आजची स्थिती
पाहून तरी असे
वाटत नाही कि
आज खरंच स्वच्छतेविषयी
सर्व जण जागृत
आहेत म्हणून कारण
आजची तरुण पिढीचं
व्यसनाधीन झालीय आणि व्यसनापायी
सगळीकडे अस्वच्छता पसरवत चालला
आहे.पुड्या खाऊन
तो कुठेही थुकतोय
,कचरा करतोय नको
तिथे .हे कुठे
तरी थांबायला हवे.आणि सर्व
युवा पिढीने स्वच्छता
विषयी निर्धार केला
पाहिजे.खरंतर या सर्व गोष्टी
आणि सवयींसाठी त्याग
करायला हवा .आणि
आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य
यांचे जरा भान
ठेवायला हवे.गांधीजींनी
सांगितलेल्या स्वच्छतेचे विचार सर्वांनी
आचरण करायला पाहिजेत.
सार्वजनिक स्वच्छतेविषयी ते
गांधीजी खूप जागरूक
होते .जे लोक
स्वच्छतेचे नियम मोडतात
ते आपल्या समाजालाही
बदनाम करीत असतात
असे स्पष्ट आणि
परखड मत होते.रस्त्यावर थुंकू अथवा
नाक शिंकरू नये.
त्यातून रोगराईचा संसर्ग होऊ
शकतो. पान – तंबाखू
खाऊन जे रस्त्यावर
थुंकतात, ते दुसर्याचा विचार
करीत नाहीत. एखाद्याने
तसे केलेच तर
त्यावर निदान माती टाकावी’.सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र
विसर्जन करणे हा
गुन्हा मानला जावा .सातत्याने
गांधीजी सार्वजनिक स्वच्छतेचा आग्रह
धरीत आले आणि
समाजाला तो आदर्श
देण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या
अनुयायांनी प्रसंगी झाडू हाती
घेण्यासही मागेपुढे पाहिले नाही.
जो मळक्या पायांनी
येईल, तो माझ्या
मनात प्रवेश करू
शकणार नाही, असे
गांधीजी उद्गारले होते.ज्या
आदर्श ग्रामजीवनाचे स्वप्न
गांधीजींनी पाहिले, त्यामध्ये सार्वजनिक
स्वच्छतेलाही त्यांनी महत्त्व दिलेले
आहे. असे गाव
जेथे कोणी निरक्षर
नसेल, कोणी बेरोजगार
नसेल, सर्वांना पुरेसे
काम असेल, प्रत्येकाला
हवेशीर घर असेल,
शरीर झाकणारी खादी
असेल, सर्व गावाला
आरोग्याच्या व सार्वजनिक
स्वच्छतेच्या नियमांचे ज्ञान असेल,
असा आदर्श गाव
गांधीजींना अभिप्रेत होता. दुर्दैवाने
स्वातंत्र्याचा अर्थ आपण
स्वैराचार असाच घेतला
आणि जे जे
सार्वजनिक त्याचा वाली कोणी
नाही असा समज
करून घेतला. परिणामी
सार्वजनिक ठिकाणे ही अतिक्रमणे,
गलीच्छता यांची आगरे ठरली.
गांधीजींनी प्रत्येक व्यक्तीच्या आत्मशुद्धीचा
आग्रह धरला होता.
आपले विचार शुद्ध
ठेवा, शारीरिक व
मानसिक श्रमांमध्ये संतुलन राखा
आणि प्रत्येक कामामध्ये
स्वच्छता पाळा असा
त्यांचा संदेश होता. पाणी,
अन्न आणि हवा
या तिन्ही गोष्टींची
स्वच्छता राखली, तर अनारोग्याची
समस्या उद्भवणार नाही आणि
केवळ स्वतःच्या वैयक्तिक
स्वच्छतेपुरतेच पाहू नका
तर चोहीकडे तशा
प्रकारची स्वच्छता राहावी याची
काळजी घ्या असे
गांधीजी सांगायचे. आज देशभरात
गांधीजयंती साजरी करीत असताना
गांधीजींचा सार्वजनिक स्वच्छतेसंदर्भातील हा
किमान विचार जरी
प्रत्येकाने लक्षात ठेवला, तरी
ती त्यांना खरी
श्रद्धांजली ठरेल.
लेखक :- विजय
वाठोरे सरसमकर (साहिल)
हिमायतनगर जि.नांदेड
9975593359
===================================================================
आजची पिढी संस्कारक्षम आहे का ?
आजच
युग हे संगणक
युग आहे आणि
आजची पिढी हि
तितकीच बुद्धिमान व चाणाक्ष
आहे.आजची पिढी
याविषयी वास्तवता खूपच भयानक
आहे .म्हणून या
बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार
नाही .आज समाजात
जे काही घडत
आणि घडणार आहे
या सर्व बाबी
फक्त आजच्या पिढीवर
निर्भर आहे.यामुळे
आजची पिढी हि
संस्कारक्षम आहे असं
मला तरी वाटत
नाही .
आजच्या पिढीतील कित्येकजण
व्यसनेच्या अधीन गेले
आहेत. भारत देश
हा तरुणांचा देश
म्हणून संबोधला जातो. पण
जर तरुण मोठ्या
प्रमाणावर व्यसनाच्या आहारी जात
असेल तर कोणत्या
प्रकारे त्या देशाची
प्रगती घडू शकेल? यासाठी
आवश्यकता आहे ती
संस्कारांची.भारतीय संस्कार हे
खूपच वाखाणण्या जोगे
आहेत.कारण परप्रातीय
आपल्या संस्कृतीचे जोपासना करताना
दिसून येते. आणि आपली
आजची पिढी हि
पाश्चिमात्यकरणाच्या अनुकरणामुळे नीतिमूल्यं पायदळी
तुडविताना दिसत आहे.
यासाठी माध्यमे कारणीभूत आहेत.लोकमान्य टिळकांनी ज्या
उद्देशांने सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात
केली, त्याच उद्देशाला
आजची युवा पिढी
DJ लावणे, वर्गणीसाठी वाद घालणे
यामुळे गालबोट लावत आहे.
या विनाशरूपी प्रवृत्तीला
आळा घालण्यासाठी भारतीय
संस्कृतीचे पालन करणे
गरजेचे आहे.
आजची पिढी
संगणक, टॅब, स्मार्ट
फोन इत्यादी आधुनिक
उपकरणांच्या आहारी इतकी गेलेली
आहे की, त्यांना
वाचन, गायन, मैदानी
खेळ आणि त्या
माध्यमातून विकसित होणारी बुद्धी,
घडणारे मन अन्
शरीर यांचे महत्त्वच
राहिलेले नाही.फेसबूक’,
‘ट्विटर’, ‘व्हॉट्स अॅप’ यांच्या
आहारी गेल्यामुळे वाचनास
वेळ नसणारी आजची
मुले.अयोग्य कृतींना
आई-वडिलांकडून दिल्या
जाणार्या सकारात्मक प्रतिसादामुळेच आजची
पिढी बिघडत चालली
आहे. सध्या शाळा
आणि महाविद्यालये यांमध्ये
करावे लागणारे विविध
प्रकल्पही ‘सायबर कॅफे’मध्ये
जाऊन वेगवेगळ्या संकेतस्थळांवरून
माहिती शोधून पूर्ण होतात.
अनेकांच्या संदर्भात ज्ञानार्जन करण्यापेक्षा
केवळ इकडची माहिती
तिकडे घेणे आणि
गुण मिळवणे, असे
घडत आहे.संस्कार
असलेले कार्यक्रम सध्याच्या पिढीला
आवडतच नाहीत..आणि
आवडते तर काय
म्हणे ..यो यो
हनी सिंग ,हिप
हॉप,DJ गाणे सतत
हेडफोन कानात लावून ऐकत
बसने.दिवसभर कानात
‘इअर फोन’ घालून
आधुनिक गाणी ऐकल्याने
होणार्या दुष्परिणांमापासून अनभिज्ञ असलेली आजची
मुले.संगणक आणि
मोबाइल यांवरच
सर्व सोयी उपलब्ध
असल्याने कामचोरपणा आणि आळशी
वृत्ती बळकावत चालली आहे.
असते. पूर्णवेळ कानात
‘इअरफोन’ घालून आधुनिक गाणी
ऐकण्यातच त्यांचा वेळ जातो.
कुटुंबातील फुटाफूट झाल्यामुळे आजी-आजोबांकडून मिळणारे संस्कार
हे आजच्या पिढीला
माहीतच नाहीत .विभक्त कुटुंब
पद्धती मुळे आदर,समानता हि मूल्य
आजच्या पिढीला कळतच नाहीत
.मुलांचे आजचे वेळापत्रक
इतके व्यस्त असते
की, त्यांची स्थिती
केवळ स्पर्धेतील घोड्यांसारखी
झाली आहे. शाळा,
अभ्यास आणि शिकवणी
यांतच अधिक वेळ
जात असल्याने मिळणार्या
रिकाम्या वेळेत संगणकीय खेळ
व मोबाइलला वरील
खेळ किंवा फेसबुक,व्हाट्स अप यात
गुंतून रहातात. त्यामुळेही मैदानी
खेळ मागे पडले
आहेत.
मुलांना योग्य मार्गदर्शन
करून या उपकरणांचा
योग्य उपयोग शिकवणारे
मार्गदर्शक, तसेच दिशादर्शक
आज आपल्याला त्यांना
द्यायला हवेत. केवळ विचारसरणी
पालटून आपण समाज
घडवता येऊ शकणार
नाही.लहान मुले
ही ओल्या मातीच्या
गोळ्यासारखी असतात. त्यांना घडवू,
तशी ती घडतात.
‘त्यांना घडवण्यासाठी आधी स्वतःला
घडायला, म्हणजे पालटायला हवे’,
हे पालकांनी जाणायला
हवे. केवळ शाळा
आणि महाविद्यालये यांतील
शिक्षकांवर अवलंबून न रहाता
प्रत्येक पालकानेच आपल्या मुलासाठी
झटले पाहिजे. त्याचा
शिक्षक, मित्र आणि मार्गदर्शक
बनले पाहिजे.त्याच्यातील
गुणांचा विकास करून त्याचा
उपयोग योग्य प्रकारे
करवून घेण्यासाठी पालकच
हवेत.
आत्महत्या अथवा प्रेमप्रकरणांच्या
पाठीमागे न धावता
समाजामध्ये क्रांती घडवून आणण्याचे
धाडस केले पाहिजे.ऐशो-आराम
म्हणजे तारुण्य नव्हे याचे
भान ठेवून नावीन्य
शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करावा.कोणत्याही कामात गाफीलपणा
न दाखवता मोठय़ा
धैर्याने एकजूट केल्यास आजची
युवा शक्ती हीच
राष्ट्रशक्ती ठरून भारत
महासत्ता बनण्यास मदत होईल.समाजाला बळकट करण्याचे
सामर्थ्य महिलांमध्ये असल्याने महिलांनी
आजची युवा पिढी
सुदृढ व संस्कारक्षम
बनविण्याकरिता पुढाकार घेतला पाहिजे.
मुलांचे कौतुक करत बसण्यापेक्षा
मुलांवर चांगले संस्कार करून
त्यांना चांगला आहार व
चांगली दिशा दिली
पाहिजे.
आजच्या पिढीला संस्कारांची
खूप गरज आहे
त्यासाठी पालकांनी स्वता तसे
संस्कार आपल्यात बाणवून नंतर
आपल्या मुलांना लहानपणापासून त्यात
उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे
.तेंव्हा कुठे आजची
पिढी हि संस्कारक्षम
होण्यास सुरुवात होईल.आणि
आजची पिढी संस्कारक्षम
झाली तर आपल्या
भारताला प्रगत व्हायला वेळच
लागणार नाही.
विजय वाठोरे
सरसमकर
हिमायतनगर नांदेड
9975593359
=====================================================================
दिनांक ३१/१२/२०१६ रोजी**
*विषय:- चला व्यसनमुक्त होऊ...*
व्यसन म्हटलं कि,अगोदर आपल्या
आज दारू हि पुरुष ,स्त्री ,यु वावर्ग तसेच वृद्ध यांना खूपच प्रिय झालेलीआहे.खास करून युवा वर्गात दारूची ची विशेष वेळी एन्ट्रीहोते.नात्यातील जबाबदाऱ् या आणि वाढत चाललेल्या अपेक्षा यामुळेआजची पिढी पूर्णपणे व् यसनाधीन असल्याची प्रचिती जागो जागी येतआहे .त्यांना मानसिक आधार कुठेच मिळत नाही मग ते व् यसनाच्याआहारी जातात . मुलगी ना ही म्हणाली ,नापास झालं ,दगा दि ला ,पार्टी,गम झाला,ख़ुशी झाली कोणत्याही प्रसंगी फक्त आणि फक् त एकचउपाय मानतात आणि मग पी दा रू -ओढ सिगारेट असे नको नको ते मार्गांचा अवलंब करताना दिसून येतात.खरंतर तरुण पिढी आजकालव् यसनाच्या खूपच व्यसनाधीन होत चा लली आहे .यामुळे देशाची प्रगती होईल का ? यात शंकाच आहे. महा राष्ट्र शासनाने व्यसनमुक्तीसा ठीअनेक योजना राबवल्या .पण अयशस्वी ..कारण आजच्या युवापिढी साठी नुसत्या योजना राबवून चा लणार नाही तर त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.
दारूबंदी साठी काही अफलातून उपा य आहेत .प्रत्येक व्यसनी व्यक् तींनीआपापल्या मनावर ताबा ठेवला आणि हे उपाय अवलंबले तर नक्की चव्यसनमुक्ती होऊ शकते असे मला वाटते.
उपाय
सफरचंदाचा रस रोज पीत राहिल्या स किंवा सफरचंद खाल्ल्यास दारुच व्यसन सूटतं.
हेच काय पण असे हजारो उपाय सांगुन देखील व्यसनी माणुस ऐकणारा नसेल किंवा मनावर ताबा ठेवनारा नसेल तर काय फायदा. काही माणसं व्यसन सुटाव म्हणून
खरच प्रयत्न करतात का ? पण त्याच्या कुटुंबातील एखादा माणूस व्यसन सूटावं म्हणुन ही औषधे ती औषधे आणतात आणि व्यसनी मानसाला दिली जातात .पण या औषधानी खरच व्यसन सूटतं ? काहीजनांच सुटतं पण ते फक्त औषधाच्या भितीपोटी .आणि असेही बरेच आहेत की व्यसन सुटण्याच औषध घेवुन आयुष्यातुन मुक्त झाले.
अस होत असल तरी काहीजण ही औषध डाॅक्टरकडुन,भोंदुबाबाकडुन आणतात.यामुळे व्यसन सूटतं अस वाटतं पण व्यसन सुटण्यासाठी खरतर औषधाची नाही तर स्वताच्या मनाची तयारी पाहीजे.तेव्हाच कुठे व्यसनमुक्त होऊ शकतो.
उपाय
सफरचंदाचा रस रोज पीत राहिल्या

चला व्यसनमूक्त होऊ
सुखी जीवनाचा ध्यास घेवु
सुखी जीवनाचा ध्यास घेवु
✍✍विजय वाठोरे सरसमकर
( साहिल )
हिमायतनगर जि.नांदेड
9975593359
( साहिल )
हिमायतनगर जि.नांदेड
9975593359
==============================================================
मोबाईलमुळे पत्र खरेच हरवलेय का ?*
पूर्वी पत्र म्हणलं कि एक वेगळीच झलक पाहायला मिळायची,पोस्टमन घरी आला कि आतुरतेन त्या पत्राची चौकशी केली जायची.खास करून प्रेमी युगिलांसाठी ती एक पर्वणीच होती .कुणी पाहुण्याचं पत्र आलं तर घरातली सारीच अगदी आवडीने एकत्रित वाचत बसायचे.कोण काय करतंय ,हाली-खुशाली सारं काही पत्राद्वारे कळायचं .
पण कुणाचा मृत्यू झाला तर मात्र पत्राद्वारे कळवलं तर वेळेवर जाण व्हायचं नाही .
पण म्हणतात ना चांगल्या गोष्टींना लवकरच नजर लागते ....
याप्रमाणे पत्राचहि असच झालं सध्याच्या संगणक युग व नवीन तंत्रज्ञानामुळे पत्र लोप पावत आहे .
पत्र लिहायचं सोडून द्या पण आता तर पत्र हे नाव सुद्धा ऐकायला मिळत नाही.तरीही फक्त आपल्या कामापुरती म्हणून स्पीड पोस्ट किंवा दस्तावेज घेण्या-देण्यासाठीच वापर दिसून येतो.सध्या या मोबाईल मुळे तर पत्र व्यवहार पार बंदच झाल्यासारखा झालाय.
मोबाईल मधील बदलते नवनवीन तंत्रज्ञान आणि प्रगत व्हर्जन्स यामुळे प्रत्येक व्यक्ती अनेकांशी सहजच संपर्क साधू शकतोय.कोणता कार्यक्रम राहिला,त्याबद्दल शुभेच्छा देणं किंवा आमंत्रण ,निमंत्रण यासाठी फक्त आता एक कॉल केला जातो.फेसबुक , व्हाट्सअप ,मॅसेंजर , व्हिडीओ कॉलिंग आणि अश्या बऱ्याच सुविधांमुळे पत्राच नावच कुठं सापडत नाही.
मोबाईल मधील खूप साऱ्या सुविधांमुळे मोबाईल खूप लोकप्रिय ठरलाय आणि पत्र कालबाह्य झालय .
पूर्वी पत्र लिहायचं म्हणलं तर स.न.वि.वि. साष्टाग नमस्कार , अश्या शब्दांनी पत्राची सुरुवात व्हायची ,पात्रात प्रेमाची भाषा असायची.प्रेमी युगिलांचें तर संभाषणाच एक मुक्त व्यासपीठ होत.कधी कोणता पात्र कुणाच्या हाती जाईल याची भीती सतत असायची सर्व प्रेमींना ..आता हे सर्वच बांध झालंय. अन आता मोबाईल वर sms , व्हाट्सअप ,फेसबुकवर हाय हॅलो करतात सर्वच.पूर्वीसारखी मान देणारी भाषा आता ऐकायला आणि वाचायलाही मिळत नाही.
आज फक्त पाठ्यपुस्तकातच नावारूपाला उरलेलं आहे पत्र.आणि विद्यार्थी हि परीक्षेपुरतं पत्र लिहिणं जाणतो कि नाही याचाहि संशयच आहे.कारण प्रगत मोबाईल मुळे त्यावर खूपच परिणाम झालाय .मोबाईल वरूनच आता सर्व कामे होऊ लागली .एखादे कागदपत्र पाठवायचे असेल तर काढला फोटो कि ई-मेल वर किंवा व्हाट्सअप वर पाठवला जातो.आणि तोही क्षणार्धात पोहोचतो .मोबाईल च्या अश्या वापरामुळे आपल्याला म्हणता येईल कि पत्र खच कुठंतरी हरवलाय..
लहानपणी मामाच पत्र हरवलं असा खेळ खेळायचो आम्ही आणि आता लहान मुलांना पत्र हरवलं पत्र हरवलं म्हणून खेळ खेळावा लागेल कि काय असं वाटतं.
विजय वाठोरे सरसमकर
(साहिल)
९९७५५९३३५९
हिमायतनगर जि.नांदेड
======================================================
एक सुंदरस प्रेम पत्र ......!
मला नाही जमत ग
तुझ्यासारख सतत दु : खी राहण
मी दु : खातही हसरा चेहरा ठेवत असतो
कारण मी दु : खी राहिल्याने तू पण दुखी होशील ,
आणि हे मला कधीच बघवणार नाही .
तुझ ते जीवाची घालमेल करण
सर्वस्वी काही माझ्यासाठी मानतो मी,
तुला अन तुझ्या प्रेमाला जाणतो मी ,
पण सर्व काही आपल्याच मनासारख
होण हे कधीच शक्य नसतं .
माझा विश्वास नाही ग नशिबावर
पण तुझ्यावर विश्वास एवढा आहे कि
अगदी स्वतावरही नाही असा .
तू म्हणायचीस न कि आयुष्यभर साथ
देशील का ? मला धोखा तर देणार नाहीस ना ?
मी तेव्हाच जाणल होत तुझ ते हळवं मन !
मग खरच कळालं तेव्हा मला
आणि तेव्हापासूनच करतो ग मी प्रेम तुझ्यावर $
पण माझी प्रेम निभावण्याची रीत थोडी न्यारीच ग
त्यासाठी तुला काही काळ दूर रहावही लागेल .
तुला आज सर्व काही खर सांगाव म्हणून आज पेन
उचलला आणि जे मनात होत ते सर्व इथे उतरवतोय .
माझ्या आतापर्यंत च्या वागण्या ने किंवा बोलल्याने तुला
दु : ख त्रास झाला असेल तर मला तू कृपया माफ कर !
आणि हो खर सांगायचं म्हटलं तर
आपल आयुष्य आज आहे तर उद्या नाही
म्हणून मी तर प्रत्येक क्षण आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो ,
तसा तुही करावा ,
तुला हे जमणारच नाही हे माहिती असताना देखील माझा हा तगादा .
तुझ्यात माझी हि सवय बानण्याचा माझा हा प्रयत्न !
तुझी उगाचच खोडी काढून तुला चिडवण
जरूर आवडत मला ,पण तुला सतावण
आणि दु : खी करण नाही आवडत ग मला !
आज काय झालं कुणास ठाऊक ?
प्रत्येक वेळेस मी तुझ्यावर कविता करतो ,
पण आज शब्दही जुळत नाहीत
म्हणून म्हटलं लिहाव थोडस मनातलं !
तुझाच .........
साहिल
==================================================================
मैत्री .......
मैत्री ... मैत्री म्हणजे काय असते .हे जाणणारे फार थोडेच असतात .
मैत्री म्हणजे आभाळाला पडलेलं स्वप्न,मैत्री म्हणजे हारामधले रत्न .मैत्री ही ठरवून किंवा विचार करून होत नसते.जि मैत्री ठरवून केली जाते त्या मैत्री मध्ये स्वार्थ असतो.पण जि मैत्री न ठरवता आणि न कळत होते ,त्या मैत्रीत कुठलाही स्वार्थ नसतो आणि ती एवढी मजबूत बनते कि कोणी तोडण्याचा प्रयत्न जरी केला तरी तुटत नाही.
मन जुळवण्यासाठी नातं हवं असत.आणि नातं जुळवण्यासाठी विश्वास हवा असतो .त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे मैत्री असते .
मैत्रीचं आयुष्य हे
जगावेगळं असत
रक्ताचं नसलं तरी
मोलाचं असत .
मैत्री करा ती जपा .आयुष्य खरंच खूप सुंदर आहे .
मित्र ,सखा ,सोबती अशी अनेक नावे आपण आपल्या मैत्रीला देत असतो.मित्र या संकल्पनेला वयाची मर्यादा नसते.ते कधी व कोणत्या वेळेला होईल हे सांगू शकत नाही.मैत्री म्हणजे प्रेम असते.प्रेम हे फक्त स्त्री आणि पुरुषात नसते. तर ते फक्त दोन मनात असते .ज्या ठिकाणी दोन मने मिळतात त्या ठिकाणी मैत्री होते आणि तीच मैत्री खूप छान व सुंदर बनते.त्यांना एकमेकांना सोडून करमत नाही.
मैत्री म्हणजे जीवनाचा श्वास
न म्हणता बसतो त्यावर विश्वास
मैत्री म्हणजे सुंदर जीवनाची आस
इतर नात्यांपेक्षा यात असते काहीतरी खास
नातेवाईकांपेक्षा मित्रच जास्त मदतीला येतात.मैत्री म्हणजे दोन जीवांचे एकमेकांशी जुडलेलं असे नाते त्यात कुठल्याही अपेक्षा किंवा मागण्या नसतात .हृदयाच्या ऋणानुबंधाने जुडलेल्या नात्याला ,प्रेमाच्या पण निस्वार्थी व एकमेकांशी एकरूप राहणे म्हणजे मैत्री .एकमेकांच्या भावना न सांगता समजून घेणे आणि त्यावर अधिकाराने सत्ता गाजवणे ,आपुलकीचे पण हवेहवेशे वाटणारे ,मनाशी अतूट नात्याने जुडलेले नाते .ज्या नात्याला कुठल्याही आधाराची गरज नाही . ते कुठल्याही तत्वाच्या विचाराधीन नसते किंवा एकमेकांशी एकरून राहणे असे एकनिष्ठ नाते म्हणजे मैत्री.
मैत्रीचा गंध ज्याच्या जीवनात नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.कारण आपल्या घडण्यामागे जेवढा हात घरच्यांचा असतो त्यापेक्षाही जास्त प्रभाव आपल्यावर आपल्या मित्रांचा असतो .मैत्री म्हणजे असत एक अतूट बंधन.कोणतीही गोस्ट असो ती आपल्या मित्रांना सांगत राहायचं.कोणत्याही समस्या असो ती सांगायची .आणि हे सर्व आपण फक्त मित्रांनाच सांगू शकतो.कारण घरी सांगितलं तर वेगळाच इशू होईल याची भीती असते.आई बाबा काय म्हणतील याचीही भीतीच असते .पण एक सत्य सर्वच जण नाकारतात .जेवढं आई वडील समजून घेतात तेवढं कुणीच समजून घेत नाहीत.
.......साहिल .........
विजय वाठोरे सरसमकर
हिमायतनगर जि.नांदेड
9975593359
दि.०४/१२/२०१६
==============================================================================
प्रेम करणं गुन्हा आहे का ?
मानसी ही सध्या
कॉलेज ला आहे.ती दररोज
कॉलेज ला जाते आणि अभ्यासातही
खूप हुशार आहे.आतापर्यंत वर्गात पहिला
नंबर तिचाच होता.तिची आई
शासकीय सेवेत नोकरी
करते आणि वडील
इंजिनीयर आहेत .तिचा
भाऊ ,ती,व आई -वडील
असं छोटसं कुटुंब
आहे.मानसी तशी
आई वडिलांची खूपच
लाडकी .मानसीला आई-वडिलांकडून पूर्ण स्वातंत्र्य
मिळत .मानसीहि त्या स्वातंत्र्याचा
गैरवापर कधीच करत
नाही .
पण काही दिवसांनी
ती हे स्वातंत्र्य
अबाधित ठेऊ शकली
नाही .कारणही तसच
होत,तिला तिच्या
कॉलेज मधील एक मुलगा आवडू
लागतो .मग ती या ना
त्या कारणाने त्याला
भेटायची.मग काही दिवसांनी त्यांच्यात मैत्री
होते आणि काही
दिवसातच ते इतके जवळ येतात
कि दोघांचही एकमेकांवर
प्रेम होत. ते एकमकांना भेटत असत
अश्यातच त्यांचं प्रेम
खूप दृढ होत जातं.एकमेकांना
बोलल्याशिवाय त्यांना करमतच नसे.ते फोनवर
बोलत असत.काही
दिवसांनी व्हाट्सअप वर सुद्धा
चॅटिंग करू लागले.मग या
ना त्या कारणाने
ते दररोजच भेटू
लागले.
काही दिवसांनी मानसीच्या भावाला
या गोष्टीची भनक
लागते तो मानसीला
समज घालतो.पण
ती त्याच ऐकत
नाही.मानसीचा भाऊ
त्या मुलाला भेटतो
आणि त्याला धमकी
देतो .व त्याला
हे शहर सोडून
जाण्यास भाग पाडतो.
मानसी बिचारी त्या
मुलाला आठवत बसते
.पण तीही आपला
हट्ट सोडत नाही.तिला माहिती
होत कि,आपलं करिअर घडलं,नोकरी लागली
कि तिच्या मर्जीनुसार
कुणाशीही लग्न करण्याची
मुभा तिला तिच्या
आई-वडिलांकडून होती.मानसी आता
मन लावून अभ्यास
करते आणि डॉक्टर
होणारच म्हणून ती
दिवस रात्र धडपडत
आहे.
तो मुलगाही तिच्यापासून दूर
गेल्यामुळे खूप दुखी
असतो.त्यांचं मानसी
सोबत बोलणं होत
.मग दोघांनाही परिथितीची
जाण होते .दोघेही
शपत घेतात कि
,दोघांनाही नोकरी लागणार
नाही तोपर्यत आपण
दूर-दूर राहिलेलं
बरं.मग तो मुलगाही त्याच्या अभ्यासावर
भर देतो.
पण ईथेच ही
कहाणी थांबून आहे
.यासाठी कोण गुन्हेगार
आहे .मानसी ,तो
मुलगा कि प्रेम
?
नेमका दोष कुणाचा
?
तर या गोष्टीवरून
एवढं लक्षात ठेवा
कि,प्रेम करणं
हा गुन्हा नाही
पण आपापल्या जबाबदाऱ्या
,कर्तव्य पार पडून
नंतरच त्याचा नंबर
लावा .आपले आई-वडील ,त्यांच्या
आशा -अपेक्षांची जाणीव
असू द्या .या
वयात होतंच असं
पण शक्यतो सावरण्याचा
प्रयत्न करा.आई वडिलांच्या सुखातच आपलं
सुख आहे .
.......साहिल .........
© विजय वाठोरे सरसमकर
9975593359
===============================================================================
4) जाताना ती देवून गेली आठवणींच जहर .......
तो क्षण कधीच न विसरण्यासारखा होता.कारण एका गोड नात्यात दुरावा निर्माण करणारी वेळ होती,अगदीच रडण्यागत झाली होती या मनाची स्थिती.अन सावरल मी स्व:ताला .पण ती स्वताला सावरू शकली नाही.अचानक पावसाच्या मुसळधार धारा बरसाव्या त्यासम खुप अश्रू बरसवले तिने .बऱ्याच गोष्टी अर्धवट राहिल्या होत्या.ना मी तिला काही सांगितलं मानातल ना तिने मन मोकळ केल.पण प्रेमाची भावना दोन्हीही मनात सारखीच होती.गरज होती ती फक्त एका हाकेची .तेंव्हा माझ्या मनातून फक्त हीच भावना साद घालत होती.
आता मिळालीस समक्ष तर व्यक्तही करू शकत नाही
की तू मला आवडतेस ,
तुझ्या सहवासात असूनही मन काही भरत नाही
प्रत्येक क्षणी तू आणि तूच आठवतेस.
आजपर्यन सर्व दिवस असेच गेले ज्यात ती आणि मी अगदीच जवळीकतेणे नांदलो.मी केलेल्या प्रत्येक चुकीला ती हसून सहजच क्षमा करायची.दोघात चालणारी थट्टा,मस्करी दररोजचीच.अन कधीच तिने राग मानला नाही कोणत्याही गोष्टीचा.आज थोड वेगळच होत कारण माझ्या मनातली भावना ओठावर यायला तयार नव्हती .आणि तशी हिम्मतही आता राहिली नाही.तेंव्हा ती काय मनेल याकडेच माझे लक्ष लागून होते.
आमच्या या मैत्रीच्या नात्यात एवढी जवळीक साधेल अस कधी वाटलच नव्हत.पण तिच्या मनातल्या आवडी-निवडी मी अगोदरपासूनच जाणून होतो . मी हि तिला जे आवडल ते मला न आवडतानाही आवडून घ्यायचो.तिच्या आजपर्यंतच्या सहवासाने मला खूप काही शिकवलं होत .तिनेही माझ्या प्रत्येक आवडीला आपल मानलं होत.पण आज ती तिच्या रडण्यातून मला खूप काहि सांगून गेली.तिच्या मनात असणारी प्रेमाची भावना ती लपवून गेली.
तिलाही माझ्याशी काहीतरी बोलायचं होत पण ती न बोलताच निघून गेली.पण माझ्या मनात ती प्रेम जागवून गेली. सांगता न येण्यासारख अस काही ती बोलण्याआधीच दुरावली.पण मी मात्र आवडलो होतो तिला हे तिने सिद्धही केल होत.यामुळे तिच्या मनात प्रेम हे होतच.पण तीचाही नाविलाज होता म्हणून ती गेली पुन्हा कधीही न भेटण्यासाठी.....
आता शेवटी मनात एकच भावना उरली होती ......
ती म्हणजे जणू पावसाची कहर
पण कधी-कधी भासते सागराची लहर
आता सुण-सुण वाटत तिच्याविना हे शहर
जाताना ती देवून गेली आठवणींच जहर
पण कधी-कधी भासते सागराची लहर
आता सुण-सुण वाटत तिच्याविना हे शहर
जाताना ती देवून गेली आठवणींच जहर
विजय वाठोरे सरसमकर(साहिल)
ता.हिमायतनगर जि.नांदेड
9975593359
ता.हिमायतनगर जि.नांदेड
9975593359
==========================================================================
साहित्य काव्यगंध आयोजित ...
स्पर्धेसाठी ...
लेख
** आई-वडील आणि वृद्धाश्रम ...... **
आई ,जी आपलं सार काही सुख आपल्या मुलांमध्ये पाहत असते .
आपल्या मुलांना ती फुलापरी सांभाळत असते .कितीही काम असो ती आपल्या मुलांसाठी मात्र त्यांच्या अश्यक्य अशा आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिनरात झटत असते .वडील जे सर्व काही जग आपल्या मुलांना मानतात .लहानपणापासून अगदी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत ,एवढच नाहीतर प्रत्येक क्षणी त्यांच्या म्हणेल त्या हट्टाचा पाठपुरावा करणारे .
पण आई वडील यांना न दुखवता त्यांच्याशी सल्लोख्याने राहणारे कुटुंब क्वचितच पाहायला मिळतात .अगदी माझ्या अनुभवातही असे बरेचसे किस्से आहेस जे मी सांगितले तर नक्कीच डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत .
एके दिवशी मी स्टेशनहुन घराकडे येत होतो रस्त्यात एक आजीबाई भेटल्या ...

आजी : सायब लय भूक लागलीय ..काई खाण्यासाठी पैसे द्या कि ?
मी : आजी दिले मी पैसे तुमाला पण तो तुमचा आताचा प्रश्न मिटेल ..पुढचं काय ..
कुठं राहता तुम्ही ? तुमचे घर नाही काय ?
आजी : बापू आता तुला कसं सांगू लेका ..
घर हायबी अन नायबी ...
मी : असं का बर ?
आजी : ज्या लेकरांना मी माझ्या हिस्याची भाकरी दिली तेच बेईमान झालेत...
मी : कोणतं गाव तुमचं ?
आजी : गाव बिव काही इचारू नको बाबा ..
तशी सांगून काही फायदा नाय अन तोटा नाय
मी : तुमि तुमच्या मुलांकडे राहत नाही का ..?
आजी : माझे दोन मुलं आहेत .एक डॉक्टर हाय अन दुसरा मास्तर हाय ...
अन माझे पती गेले स्वर्गलोकी.....
मी: मग तुमि कुणाकडे राहता ..?
आजी: कुणाकडे म्हणजे कुणाकडेच नाही राहत ....
कारण माझ्या डॉक्टर मुलाला मी एक ओझं वाटते ,अन त्याच्या बायकोला बिनकामी अन गच्छाळ वाटते ....
म्हणून त्यांना कशाला माझा त्रास म्हणून मी निझाले आपली वृद्धाश्रम शोधायला ....
मी : आणि तुमच्या दुसऱ्या मुलाकडे का नाही राहत ...?
आजी : तो मास्तर व्हय....त्याला तर वेळच नसतो माझ्यासाठी ,त्याची बायकोही क्षण क्षणाला हिस-किस करत असते मला ...
म्हणते मला खायला भेटतं न मग खायचं गप गुमान ..अन पडून राहायचं
शिळ्या भाकरी अन चटणी खाऊन कंटाळा आला अन चावत पण नाही म्हणून त्या सुनबाईला थोडी नरम भाकरी तरी दे म्हणलं तर म्हणते मला ... तोरा तर पहा ,,काम ना कवडीचं पण खाणं मात्र नरम-गरम पाहिजे म्हातारीला ...
अन यावरूनच भांड-भांड भांडली ती , तो मास्तरही काहीच म्हणेना तिला ....मग काय तीन काढलं मला घराबाहेर ....
हे सर्व ऐकून माझ्या डोळ्यातून टचकन पाणी गळालं.....त्या आजीबद्दल आपुलकी वाटली ..त्यांना मी एका वृद्धाश्रमात सोडून आलो..
मी : आजी दिले मी पैसे तुमाला पण तो तुमचा आताचा प्रश्न मिटेल ..पुढचं काय ..
कुठं राहता तुम्ही ? तुमचे घर नाही काय ?
आजी : बापू आता तुला कसं सांगू लेका ..
घर हायबी अन नायबी ...
मी : असं का बर ?
आजी : ज्या लेकरांना मी माझ्या हिस्याची भाकरी दिली तेच बेईमान झालेत...
मी : कोणतं गाव तुमचं ?
आजी : गाव बिव काही इचारू नको बाबा ..
तशी सांगून काही फायदा नाय अन तोटा नाय
मी : तुमि तुमच्या मुलांकडे राहत नाही का ..?
आजी : माझे दोन मुलं आहेत .एक डॉक्टर हाय अन दुसरा मास्तर हाय ...
अन माझे पती गेले स्वर्गलोकी.....
मी: मग तुमि कुणाकडे राहता ..?
आजी: कुणाकडे म्हणजे कुणाकडेच नाही राहत ....
कारण माझ्या डॉक्टर मुलाला मी एक ओझं वाटते ,अन त्याच्या बायकोला बिनकामी अन गच्छाळ वाटते ....
म्हणून त्यांना कशाला माझा त्रास म्हणून मी निझाले आपली वृद्धाश्रम शोधायला ....
मी : आणि तुमच्या दुसऱ्या मुलाकडे का नाही राहत ...?
आजी : तो मास्तर व्हय....त्याला तर वेळच नसतो माझ्यासाठी ,त्याची बायकोही क्षण क्षणाला हिस-किस करत असते मला ...
म्हणते मला खायला भेटतं न मग खायचं गप गुमान ..अन पडून राहायचं
शिळ्या भाकरी अन चटणी खाऊन कंटाळा आला अन चावत पण नाही म्हणून त्या सुनबाईला थोडी नरम भाकरी तरी दे म्हणलं तर म्हणते मला ... तोरा तर पहा ,,काम ना कवडीचं पण खाणं मात्र नरम-गरम पाहिजे म्हातारीला ...
अन यावरूनच भांड-भांड भांडली ती , तो मास्तरही काहीच म्हणेना तिला ....मग काय तीन काढलं मला घराबाहेर ....
हे सर्व ऐकून माझ्या डोळ्यातून टचकन पाणी गळालं.....त्या आजीबद्दल आपुलकी वाटली ..त्यांना मी एका वृद्धाश्रमात सोडून आलो..
आता सोसायचं बळ नाई र लेका माझ्यात
तुझ्या हरकतीतून अन बोलण्यातून
सार काही मला कळलंय
माझ्यामुळे होतोय तुला त्रास
अन मी झाले आता भुईला भार
म्हणून चाललेय तुझं सोडून सार
नात्या-गोत्यांच्या या
बंधनातून मुक्त होऊन
माझं म्हणायचं असं काही
तू ठेवलंच नाहीस आता
म्हणून चाललेय तुझं सोडून सार
भेटावं वाटलंच तर ये
भेटेल मी कोण्यातरी वृद्धाश्रमात
अशीच आपलं जीवन जगण्यासाठी
कुटके मोडत असेन मी वृद्धाश्रमात
तू दिलेल्या दुःखाचं
मी बांधलाय आता गाठोडं
अन त्यांना जाता जाता
देईन मी नदीत सोडून
खूप काही आशा होत्या रे अजून
अन अनंत स्वप्न रंगविली होती
बहुतेक ईश्वराला मान्य नसतील
म्हणून चाललेय तुझं सोडून सार .....
म्हणून चाललेय तुझं सोडून सार ......
समाजात चालू झालेल्या या प्रथेला म्हणजेच आई वडिलांना वृद्धाश्रमात धाडाण्याला कुठे तरी आळा बसला पाहिजे .असं कसं मन होत त्यांचं आपल्याच आई-वडिलांना वृद्धाश्रमात धाडण्याचं..याबद्दल ऐकून अन बघून खूप थक्क होतो मी....
या साऱ्यात सुशिक्षितांचंच प्रमाण जास्त दिसतं, कि त्यांनी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडलं..पण अशिक्षित अन खेड्यात आजही एकत्र कुटुंब पद्धती अन आई-वडिलांचा मान राखला जातो.तिथे वृद्धाश्रमात धाडायचं सोडा पण आई-वडिलांचं मनही दुखावलं जात नाही .
पण असे काही महारथी आहेत कि त्यांना आई-वडिलांची परवाच नाही अन त्यांना शिड-शिड करत वृद्धाश्रमाचा रास्ता दाखवतात ..
महाराष्ट्रात वृद्धाश्रमाचा दृष्टीने बघता त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे .हि सद्यस्थितीची खूप मोठी शोकांतिका आहे .पण हे सार काही आता बदलायला हवं .सर्वांनीच आपापल्या आई-वडिलांना काळजीपूर्वक वागविले पाहिजे ,त्यांना सुखी ठेवलं पाहिजे .
घरात आजी-आजोबा असतील तर लहान मुलांवर चांगले संस्कारही पडतील अन त्यांनाही नातवंडांना घेळण्याचा ,बागडण्याचा आनंद मिळेल .आणि सर्वात महत्वाची गोस्ट म्हणजे सर्वच मुलींनी,सुनांनी आपल्या सासूला सासर्याला आपले आई वडील मानुन त्यांची सेवा करायला हवी ..

(साहिल )
९९७५५९३३५९
Vijaywathore0@gmail.com
(साहिल )
९९७५५९३३५९
Vijaywathore0@gmail.com
24/12/2016
=============================================================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा