सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

बाल कविता ......


रम्य असे हे बालपण
लडीवाळपणाची गाणी
मिञांसोबतच्या गोड अन
अल्लडपणाची वाणी

न वेळेची न ठीकाणाची पर्वा
खेळण्यात असे होतात गूंग
मनी रंगवतात स्वप्न सप्तरंगी
मिञांच्या सोबतीने घेतात भरारी उत्तुंग

निसर्गरम्य अशा वातावरणी
खेळ आपला हा सुरु होतो
अलगुज वृक्षाची फांदी लोमकाळीत
मग आपणच आपले गुरु होतो

सुज्ञ जरी नसलो आमी
वेळीच खेळ आटोपुन घेवु
चालण्या अनंत या जगी
मिञांचीच साथ सदा घेवु


                       ✍विजय वाठोरे सरसमकर
                                 साहिल
                            9975593359

=====================================================================

चंद्र आणि सुर्य.....


चंद्र आणि सुर्य.....


कविमन माझ करत भावनांना व्यक्त
कधी चंद्राचा तर कधी सुर्याचा भक्त

रचना उमलत्या कळीची असो की बूजुर्ग म्हातार्याची
उपमा माञ ठरलेली चंद्र सुर्य तार्यांची

मनाला भावत असते चंद्राची शितलता
प्रेमात विरहासारखी ही सुर्याची प्रखरता

प्रेयसीची कधी प्रियकराची बनते कहाणी
चंद्र जसा तडपतो तशी माझी गाणी

सुर्याला अस केल बदनाम कुणी
अन चंद्रास दिली उपमा गुणी


                                    ✍✍विजय वाठोरे सरसमकर
                                            ( साहिल )
                                        9975593359

===============================================================================

म्हणून चाललेय तुझं सोडून सार ......



आता सोसायचं बळ नाई र लेका माझ्यात 
तुझ्या हरकतीतून अन बोलण्यातून 
सार काही मला कळलंय 
माझ्यामुळे होतोय तुला त्रास
अन मी झाले आता भुईला भार
म्हणून चाललेय तुझं सोडून सार
नात्या-गोत्यांच्या या
बंधनातून मुक्त होऊन
माझं म्हणायचं असं काही
तू ठेवलंच नाहीस आता
म्हणून चाललेय तुझं सोडून सार
भेटावं वाटलंच तर ये
भेटेल मी कोण्यातरी वृद्धाश्रमात
अशीच आपलं जीवन जगण्यासाठी
कुटके मोडत असेन मी वृद्धाश्रमात
तू दिलेल्या दुःखाचं
मी बांधलाय आता गाठोडं
अन त्यांना जाता जाता
देईन मी नदीत सोडून
खूप काही आशा होत्या रे अजून
अन अनंत स्वप्न रंगविली होती
बहुतेक ईश्वराला मान्य नसतील
म्हणून चाललेय तुझं सोडून सार .....
म्हणून चाललेय तुझं सोडून सार ......


                                   विजय वाठोरे सरसमकर
                                         (साहिल )
                                    ९९७५५९३३५९
                             vijaywathore0@gmail.com
==========================================================================

बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

आठवण नक्कीच असेन .....




हि वेळ पुन्हा येईल न येईल 
पण तुझ्या संगतीची आठवण नक्कीच असेन 

आपली भेट पुन्हा होईल न होईल 
पण तुझ्या गमतीची आठवण नक्कीच असेन 

पुन्हा हे गहिरे नाते जुळेल न जुळेल 
पण तुझ्या प्रीतीची साठवण या हृदयात नक्कीच असेन 

पुन्हा अशी आपुलकी मिळेल न मिळेल 
पण तुझ्या हळवेपणाची साठवण नक्कीच असेन 

पुन्हा या चेहऱ्यावर निखळ हसू दिसेल न दिसेल 
पण या हसूच कारण बनणारी तुझी आठवण नक्कीच असेन 

पुन्हा अशी थट्टा,मस्करी,मस्ती होईल न होईल 
पण या अमृतरूपी क्षणांची आठवण नक्कीच असेन 

अशी प्रीत पुन्हा जुळेल न जुळेल 
पण माझिया लोचनी तुझ्या नावचा अश्रू नक्कीच असेन 

या जगी तू असेल वा नसेल 
पण माझा प्रत्येक श्वास तुझ्या नावचा नक्कीच असेन 

या शरीरात प्राण असेल ना नसेल 
पण तुझी प्रीत शेवटपर्यंत नक्कीच असेन 


                                         विजय वाठोरे सरसमकर
                                         हिमायतनगर जि.नांदेड
                                           9975593359

================================================

हुंडा बंदी......


हुंडाबंदी करू
नुसतेच नारे
काही झालं तरी
घेतातच सारे 

प्रचलित रूढी
अन परंपरा
माणुसकी धर्म
हाच का हो  खरा

घेत नाही हुंडा
बोलतात  खोटे
हुंडा बंदी झाले
आव्हानच मोठे

हुंड्यापायी होतो
नको तसा छळ
मुक्त अश्या स्रीला
मिळेल का बळ

मानसिकता हि
बदलून आता
द्यायची आहे ती
स्रीच्या हाती सत्ता

पाहून दैना हि
झालो हतबल
हुंडाबंदी साठी
झालो मी पैदल

फिरतो मी असा
निर्मूलनासाठी
न भेटला कुणी
साथ देण्यासाठी

करू चला आता
हुंडा बंदी न्यारी
नांदेल सौख्यात
दुनिया हि सारी


विजय वाठोरे सरसमकर 
99755933549
21/12/2016

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

अधुरी प्रीत .....


  
प्रेम हे तेंव्हापासून कळायला लागलं
जेंव्हा तू माझ्या जीवनात आलीस 
अन मला प्रेम म्हणजे काय असत  
याची परिभाषा शिकवत आलीस 

अगदी सुरुवातीपासून मी तुझाच होतो
आताही आहे अन पुढेही राहीन
फक्त तू होतीस माझ्या जीवनी 
तुझ्यासाठीस माझं जीवन वाहीन 

कॉलेजच्या जीवनात प्रीत आपली 
जणू श्रावणासारखी बहरायची
आता तर तूहि नाहीस सोबत 
अन सवयच जडली एकटं राहायची 

का आणि कसा वागतोस 
म्हणून सर्वजण मला विचारात असतात 
पण कोण समजेल आता मला 
तुझ्याच आठवणीत हे अश्रू पाणावत असतात 

तुझी माझी प्रीत अशी 
बहरण्यापासून वंचितच राहिली 
अन त्यात तुझं ते सोडून जाणं
माझी जिंदगी सारी यातनामय जाहली 

आपल्या नशिबातल प्रेम  
असं कसं अधूर राहिलं 
अन आपल्या जीवनात 
प्रीतीचं फुल उमलायचंच राहिलं

माझ्या अधुऱ्या प्रेमाची 
अधुरी अशी हि कहाणी 
प्रीतवेड्याला या तुझ्या 
का सोडून गेलीस ग तू राणी 

असा झालो मी बेभान 
हरपलं माझं सार देहभान 
अधुऱ्या माझ्या प्रीतीचं 
अधुरं असं हे  गाणं 

अधुऱ्या माझ्या प्रीतीचं
अधुरं असं हे गाणं .......



.........साहिल.......
विजय वाठोरे सरसमकर 
ता.हिमायतनगर जि.नांदेड 
9975593359  

सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

तु माझी नाही होऊ शकलीस.....





तुझ्या प्रेमाचं सत्य मला आता कुठं कळलं होत
बेवफाईत बुडून तुझ चरीञ अस मळलं होत

तु माञ खुशाल तुझ्या मनासारख केल होतस
तुला दुसऱ्याच्या बाहुत पाहुन माझ मन माञ जळलं होत

तु अशी माझ्या मनात भरली होतीस
तु अन तुझ्या आठवणींनी मला छळलं होत

तुझी ती मादक अदा मला खुपच आवडायची
नको म्हणता माझ लक्ष तुझ्या पाठमोऱ्या छबीकडे वळलं होत

तु माझी नाही होऊ शकलीस म्हणुनच की काय
तुझ्या नावाचं पान माझ्या वहीतुन बहुदा गळलं होत


.........साहिल.........
विजय वाठोरे सरसमकर
ता.हिमायतनगर जि.नांदेड
  9975593359

रविवार, ११ डिसेंबर, २०१६

*पत्र, प्रेम आणि पाऊस **


( मनापासुन मनापर्यत........
       आयोजित
** काव्य स्पर्धा **
या कवितेसाठी  द्वितीय क्रमांक )

मला आजही आठवतं
तुझं मला दिलेलं ते प्रेमपत्र
आणि जशी तू यायचीस माझ्या भेटीला
तेव्हा सुरु व्हायचं पावसाचं सत्र 

मग तू आणि पाऊस
अगदी शहारून जायचो मी
तुला होऊ नये सर्दी
म्हणून छत्री व्हायचो मी 

अवचित त्या क्षणी
तुही मुद्दाम भिजायचीस
अन मलाही त्या पावसात
नको म्हणता भिजवायचीस 

तुझ्यासवे मीही व्हायचो चिंब
मग स्तब्ध होऊन तुला पाहत राहायचं
तुझा आणि पावसाचा संगम
त्यात आपलं प्रेम अजूनच बहरायचं

तू नसताना अबोल होतो मी
अन शब्द भांडून जातात
भावना माझ्या बसतात रुसुन
मग सहजच शब्दात सांडून जातात 

तुझा तो अट्टाहास
मला आजही खूप आवडतो
तुझ्या त्या रेशीम बंधांना
माझ्या कवितेत सावडतो


.......साहिल .........
विजय वाठोरे सरसमकर
9975593359
vijaywathore0@gmail.com

तेव्हा कुठे कविता जुळुन येते....


तु
तुझ्यासाठी
तुला
तुझ्यामुळे
अशा शब्दांखेरीज
जेव्हा शब्दच सुचत नसतात
तेव्हा फक्त आणि फक्त
आठवण सतवत असते
अन त्या आठवणीस
जेव्हा शब्दरुप मिळतात
तेव्हा कुठे कविता जुळुन येते
का तर मी या आठवणी
चिरकाल स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करतो
पण कधी कधी तुझ्या भावनांना
मी माझ्या कवितेत उतरवुच शकलो नाही
कारण तु मला त्या भावना
कधी सांगण्याचा प्रयत्नच केला नाही
अन मी फक्त एक आशा ठेवली तुझ्यावर
तीही तु फक्त माझीच आहेस म्हणुन
पण माहीत नाही तुझ्यात कोणता भाव आहे
आपलच म्हणणं खर ठरवतेस तु
अल्लडपणा तर असा ठासुन भरलाय तुझ्यात
की सांगता सोय नाही
कस सांगावं अन कस वर्णन करावं
हेही कळेना मला आता
फक्त तु भेटलीस
अन दिसलीस जरी
तर कारण मिळत
कविता जुळण्याला

✍✍साहील✍✍
विजय वाठोरे सरसमकर
हिमायतनगर जि.नांदेड
9975593359

न कळले ग मला काही....

न कळले ग मला काही....

न कळले ग मला काही
कसा मी तुझ्यात सामील झालो
तुला बघण्यासाठी आतुर
अन तुला लिहीण्यासाठी गाफील झालो

प्रतेक वेळी तुझाच विषय मनी
न भेटे मज दुजा विषय लिहीण्यासाठी
तुझ्याच असण्याचे भास सतत
अन तुच माझा श्वास जगण्यासाठी

कधी होतेस तु अल्लड थंडी
तर कधी वाटतेस म्रगनयनी
तुझ्या असण्यात सर्वस्व मानतो मी
अन तुझ्याशिवाय कुणीच नाही मनी

........साहिल..........
विजय वाठोरे सरसमकर
9975593359

तू आणि मी ......




तू आणि मी ......

तुझ्या आणि माझ्या
सहवासाचे क्षण
म्हणजे माझ्या कविता
अन तुझ्यात गुंतलेलं माझं  मन

तू अशी काही बोलतेस
कि मी माझाच नसतो
तुझा अल्लडपणा
तुझ्यात मी फसतो

तुझं  ते चुटकी  वाजून बोलणं
मला क्षण क्षण  आठवत
तुझं ते अबोल प्रेम
माझ्या भावनांना गोठवतं

...........साहिल........
विजय वाठोरे सरसमकर
9975593359

सुधाकरी





बाहुत ये माझ्या 
जाऊ नको दूर 
मनी हुरहूर 
तुझ्यापायी .....!

अशी माझी पियू 
नटरंगी चाल 
झाले माझे हाल 
तुझ्यापायी ......!

हसू किती छान 
गुलाबी ते गाल
कळले ग काळ 
न्याहाळूनि .......!

दरवळ तुझी 
खूपच ग न्यारी 
सुगंधित प्यारी 
पियू माझी ......!

तुझ्यात मी मग्न 
नाही देहभान 
प्रीतीचा हे गाणं 
तुझ्यासाठी.....!

सांगू कसे तुम्हा 
आवडते परी 
आहे ती हो खरी 
हृदयी माझ्या ....!

किती आणि कशी 
वर्णू माझी परी 
आहे ती सुंदरी 
ती बावरी ......!

.........साहिल........

ह्रदयी साठवली...


ह्रदयी साठवली
तुझी सावली
मग लागला छंद नवा
प्रित ही जुळली 
क्षणात उजळली 
घेऊन आली मनात  आठवणींचा  थवा


...........................साहिल

आज तुझ्याच प्रेमात मी धूंद आहे...


आज तुझ्याच प्रेमात मी धूंद आहे
विरह यातनांचा तर विषयच बंद आहे


तु हसतेस त्यासम दरवळतो हा निशीगंध आहे
माझ्या प्रतेक रचनेत तुझाच गंध आहे


तुझ्याविण माझी काव्य सरिता मंद आहे
तुला कवितेत शब्दबद्ध करणं माझा छंद आहे



          साहिल
विजय  वाठोरे सरसमकर
15/11/2016

मींदा-त्री....


मींदा-त्री


साथ देण्याचे वादे
खोटेच ठरविले तीने

तरीही दोष मलाच का ?


.........साहिल 

कविता माझी ........


कविता माझी ......


कविता माझी
मी देऊन ऱ्हायलो वर्तमानपत्राले
मग काय सांगू तुमाले
मले भल्याभल्यांचे फोन येऊन ऱ्हायले

म्हणे काय तर
तुम्ही कवी कायले बनले ?
अन त्यात तुम्ही काय
तुमचेच गऱ्हाणे मांडून ऱ्हायले ?

खरं सांगा कवी महाशय
कवितेपाई तुम्ही पोट्टी पटू ऱ्हायले ना
तुम्ही लिहिलेली कविता वाचून
आम्ही सैराट होऊन ऱ्हायले ना

एके दिवशी माझा
प्रेमकथेचा लेख प्रसिद्ध झाला
मग काय सांगू तुमाले
मले पोट्टीचेच फोन येऊन ऱ्हायले

म्हणे एक पोट्टी मले
तुमची प्रेयसी सोडून गेली म्हणे तुमाले
मग माझ्यासाठी आहे का जागा रिकामी
माझा दिल देईल मी तुमाले


                            साहिल
                 विजय वाठोरे सरसमकर

तुझे वळुन बघणे.....(अष्टाक्षरी )

तुझे वळुन बघणे.....(अष्टाक्षरी )


काय सांगु सये तुला
खुप सतावते मला
तुझे वळुन बघणे
तुझे हसुन बोलणे

तुझ्या अदांची किमया
खुप छळतेस मला
रुपाची लावण्य परी
खुप भाळतेस मला

तुझ्या ओठांची हि लाली
करते मला बेधुंद
तुझ्या बोलण्याची ढब
तुझ्यातच झालो धुंद

तुझे मिचकेसे डोळे
कहर माजवतात
तुझे हे रेशमी केस
कवीता सजवतात


...........साहिल...........
विजय वाठोरे सरसमकर
01/12/2016
08:00 pm
💖💖💖💖💖💖💖💖💖

बाप.......(अष्टाक्षरी )


बाप.......(अष्टाक्षरी )

दिस गेला डोईवर
काम करीत राहीला
बाप माझा पाठीराखा
सीनं वाहीत राहीला

अर्धपोटी उपाशीच
कोंडमारा मी पाहीला
आमच्यापाई बापाचा
उपवास मी पाहीला

थकले न पाय त्याचे
कष्ट साहीत राहीला
नाम मुखी विठोबाचे
गीत गायीत राहीला

थांबला न तो कधीही
जरी आजारी राहीला
कर्ता धर्ता सर्व तोच
जगी काळोखी राहीला


............साहिल...........
विजय वाठोरे सरसमकर
9975593359

तुझ्यासवे......


 तुझ्यासवे......


तु आलीस अन माझा चेहरा खुलला
तुझ्या गुलाबी गालांना आज भुलला

तुझी माझी अशी वेगळीच प्रित
तुझ्या खुशीतच मानतो मी जीत

तुझ्यासवे तुझा अल्लडपणा मला भावतो
तुझी बावरी छबी मी काव्यात दडवतो


✍✍✍साहिल✍✍✍

फोन तिचा आला ....

फोन तिचा आला ....


कामात माझ्या मी
जरा व्यस्तच होतो
मधेच फोन तिचा आला
आणि मग फोनवरच व्यस्त होतो

तिने साद घातली बोलतांना
माझ्या अन तिच्या जुन्या आठवणीला
ती म्हणाली मला छानच लिहितोस तू
भारीच रंगवतोस कवितेत तुझ्या राणीला 

राणी तुझ्या कवितेतली
तू मलाच मानतोस अजूनही
कधीतरी म्हणून नाही तर
प्रत्येकवेळेस मलाच लिहितोस अजूनही 

मी म्हणालो तिला
तुझ्या साऱ्याच सवयी आहेत माझ्यात
तुला विसरणं म्हणजे जीवन संपणं
अन तू आहेस तर सर्व काही तुझ्यात 

जगतोय मी फक्त तुझ्यासाठी
म्हणूनच करतोय तुझ्यावर कविता
माझ्या सर्व लिखाणाची तूच प्रेरणा
तुझ्याच आठवणींच्या असतात कविता 


........साहिल .......
विजय वाठोरे सरसमकर
हिमायतनगर जि.नांदेड
9975593359

रुतु हा बहरलेला.....


रुतु हा बहरलेला
थंडीने शहारलेला
माझा श्वाश ही आता
तुझ्यासाठी गहिवरलेला

तुझ्यासारखी परी
शोधली मी जगभरी
भेटलीस तु अन बघ
सजलीस माझ्या उरी

जगण्याची ठरलीस आशा
आता तुझीच ग अभिलाशा
अंतरी भिनलीस अशी
काव्याची माझ्या बनलीस परीभाषा


   .........साहिल.......
विजय वाठोरे सरसमकर
हिमायतनगर जि.नांदेड
9975593359

बालपण..........


बालपण.......... 

प्रतेक घराच घरपण म्हणजे बालपण
व्यक्तिच व्यक्तित्व म्हणजे बालपण
शाळेच अस्तित्व म्हणजे बालपण
अल्लडपणा म्हणजे बालपण
स्वभावाच वेगळेपण म्हणजे बालपण
आईचा लडीवाळपणा म्हणजे बालपण
तटस्थ हट्टीपणा म्हणजे बालपण
समाजाच समाजपण म्हणजे बालपण
बडबडपणाचा कळस म्हणजे बालपण
जगण्याची सूरुवात म्हणजे बालपण
सैराट वागणं म्हणजे बालपण
झिंगाट बागडणं म्हणजे बालपण
गोंडस दिसणं म्हणजे बालपण
शिक्षकांच सामंजश्य म्हणजे बालपण
कवींच कवीपण  म्हणजे बालपण

✍✍ साहिल  ✍✍

चारोळ्या ...


ती माझी नाही होऊ शकली
पण मी तीचाच होऊन राहीलो
तीने दिली नाही साथ मला
पण तीची वाट मी पाहुन राहीलो

✍✍साहिल

खिल्लारी जोडी संगे
प्रवास हा होतो सुंदर
मैलो मैली चाले न थकून
सहजच कापते धूसर अंतर 

    ......साहिल..........


चारोळ्या ...



अबोल प्रीत माझी
कसी ग तुला नाही समजली
क्षणाचा दुरावा नाही सहवत ग मला
या प्रेमवेड्याला तु का ग नाही समजली

..........✍✍साहिल

भावनांना आता
कुठे उरलाय थारा
जो तो करतोय
फक्त शब्दांचा मारा

✍✍साहिल

रंग झाले बेरंग
आयुष्यात ना बहर
केली नात्यांशी तडजोड
तुझ्याच आठवणींचे कहर

✍✍साहिल

अशी आज बोललीस तु
मला क्षणात अनोळखी केलस
ह्रदयात घाव केलास तु
मनातील माझ्या भावनांना बोलक केलस

✍✍साहिल

 तुझ्यापासुन दुर जाणे 
मला नाहीच ग परवडले
काय सांगु तुला आता
माझ्यासोबत काय काय घडले

                 ✍✍साहिल

तीने तर आज
नजरअंदाज केल मला
मला  वाटत बहुदा
तीच्या आठवणींनी कैद केल मला

      ✍✍साहिल

‌राञ सरली
थंडीने हुरहुरलेली
उजळली पहाट आता
सुर्याने झगमगलेली

       ✍✍साहिल

हमने जीसे अपना समझा
वो कंबक्त न समझ पाया हमे
हम तो देने निकले थे अपना दिल
पर हरकतोंसे उनकी सब समझ आया हमे

.........✍साहिल✍.......


रातीच्या स्वप्नांना....




रातीच्या स्वप्नांना 
तुझीच चाहूल आहे
प्रीतवेड्या भावनांत 
तुझेच पाऊल आहे 

                        साहिल 

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...