बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

आठवण नक्कीच असेन .....




हि वेळ पुन्हा येईल न येईल 
पण तुझ्या संगतीची आठवण नक्कीच असेन 

आपली भेट पुन्हा होईल न होईल 
पण तुझ्या गमतीची आठवण नक्कीच असेन 

पुन्हा हे गहिरे नाते जुळेल न जुळेल 
पण तुझ्या प्रीतीची साठवण या हृदयात नक्कीच असेन 

पुन्हा अशी आपुलकी मिळेल न मिळेल 
पण तुझ्या हळवेपणाची साठवण नक्कीच असेन 

पुन्हा या चेहऱ्यावर निखळ हसू दिसेल न दिसेल 
पण या हसूच कारण बनणारी तुझी आठवण नक्कीच असेन 

पुन्हा अशी थट्टा,मस्करी,मस्ती होईल न होईल 
पण या अमृतरूपी क्षणांची आठवण नक्कीच असेन 

अशी प्रीत पुन्हा जुळेल न जुळेल 
पण माझिया लोचनी तुझ्या नावचा अश्रू नक्कीच असेन 

या जगी तू असेल वा नसेल 
पण माझा प्रत्येक श्वास तुझ्या नावचा नक्कीच असेन 

या शरीरात प्राण असेल ना नसेल 
पण तुझी प्रीत शेवटपर्यंत नक्कीच असेन 


                                         विजय वाठोरे सरसमकर
                                         हिमायतनगर जि.नांदेड
                                           9975593359

================================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...