रविवार, ११ डिसेंबर, २०१६

बाप.......(अष्टाक्षरी )


बाप.......(अष्टाक्षरी )

दिस गेला डोईवर
काम करीत राहीला
बाप माझा पाठीराखा
सीनं वाहीत राहीला

अर्धपोटी उपाशीच
कोंडमारा मी पाहीला
आमच्यापाई बापाचा
उपवास मी पाहीला

थकले न पाय त्याचे
कष्ट साहीत राहीला
नाम मुखी विठोबाचे
गीत गायीत राहीला

थांबला न तो कधीही
जरी आजारी राहीला
कर्ता धर्ता सर्व तोच
जगी काळोखी राहीला


............साहिल...........
विजय वाठोरे सरसमकर
9975593359

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...