तुझ्या प्रेमाचं सत्य मला आता कुठं कळलं होत
बेवफाईत बुडून तुझ चरीञ अस मळलं होत
तु माञ खुशाल तुझ्या मनासारख केल होतस
तुला दुसऱ्याच्या बाहुत पाहुन माझ मन माञ जळलं होत
तु अशी माझ्या मनात भरली होतीस
तु अन तुझ्या आठवणींनी मला छळलं होत
तुझी ती मादक अदा मला खुपच आवडायची
नको म्हणता माझ लक्ष तुझ्या पाठमोऱ्या छबीकडे वळलं होत
तु माझी नाही होऊ शकलीस म्हणुनच की काय
तुझ्या नावाचं पान माझ्या वहीतुन बहुदा गळलं होत
.........साहिल.........
विजय वाठोरे सरसमकर
ता.हिमायतनगर जि.नांदेड
9975593359
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा