फोन तिचा आला ....
कामात माझ्या मी
जरा व्यस्तच होतो
मधेच फोन तिचा आला
आणि मग फोनवरच व्यस्त होतो
जरा व्यस्तच होतो
मधेच फोन तिचा आला
आणि मग फोनवरच व्यस्त होतो
तिने साद घातली बोलतांना
माझ्या अन तिच्या जुन्या आठवणीला
ती म्हणाली मला छानच लिहितोस तू
भारीच रंगवतोस कवितेत तुझ्या राणीला
माझ्या अन तिच्या जुन्या आठवणीला
ती म्हणाली मला छानच लिहितोस तू
भारीच रंगवतोस कवितेत तुझ्या राणीला
राणी तुझ्या कवितेतली
तू मलाच मानतोस अजूनही
कधीतरी म्हणून नाही तर
प्रत्येकवेळेस मलाच लिहितोस अजूनही
तू मलाच मानतोस अजूनही
कधीतरी म्हणून नाही तर
प्रत्येकवेळेस मलाच लिहितोस अजूनही
मी म्हणालो तिला
तुझ्या साऱ्याच सवयी आहेत माझ्यात
तुला विसरणं म्हणजे जीवन संपणं
अन तू आहेस तर सर्व काही तुझ्यात
तुझ्या साऱ्याच सवयी आहेत माझ्यात
तुला विसरणं म्हणजे जीवन संपणं
अन तू आहेस तर सर्व काही तुझ्यात
जगतोय मी फक्त तुझ्यासाठी
म्हणूनच करतोय तुझ्यावर कविता
माझ्या सर्व लिखाणाची तूच प्रेरणा
तुझ्याच आठवणींच्या असतात कविता
म्हणूनच करतोय तुझ्यावर कविता
माझ्या सर्व लिखाणाची तूच प्रेरणा
तुझ्याच आठवणींच्या असतात कविता
........साहिल .......
विजय वाठोरे सरसमकर
हिमायतनगर जि.नांदेड
9975593359
विजय वाठोरे सरसमकर
हिमायतनगर जि.नांदेड
9975593359
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा