( मनापासुन मनापर्यत........
आयोजित
** काव्य स्पर्धा **
या कवितेसाठी द्वितीय क्रमांक )
तुझं मला दिलेलं ते प्रेमपत्र
आणि जशी तू यायचीस माझ्या भेटीला
तेव्हा सुरु व्हायचं पावसाचं सत्र
आणि जशी तू यायचीस माझ्या भेटीला
तेव्हा सुरु व्हायचं पावसाचं सत्र
मग तू आणि पाऊस
अगदी शहारून जायचो मी
तुला होऊ नये सर्दी
म्हणून छत्री व्हायचो मी
अगदी शहारून जायचो मी
तुला होऊ नये सर्दी
म्हणून छत्री व्हायचो मी
अवचित त्या क्षणी
तुही मुद्दाम भिजायचीस
अन मलाही त्या पावसात
नको म्हणता भिजवायचीस
तुही मुद्दाम भिजायचीस
अन मलाही त्या पावसात
नको म्हणता भिजवायचीस
तुझ्यासवे मीही व्हायचो चिंब
मग स्तब्ध होऊन तुला पाहत राहायचं
तुझा आणि पावसाचा संगम
त्यात आपलं प्रेम अजूनच बहरायचं
मग स्तब्ध होऊन तुला पाहत राहायचं
तुझा आणि पावसाचा संगम
त्यात आपलं प्रेम अजूनच बहरायचं
तू नसताना अबोल होतो मी
अन शब्द भांडून जातात
भावना माझ्या बसतात रुसुन
मग सहजच शब्दात सांडून जातात
अन शब्द भांडून जातात
भावना माझ्या बसतात रुसुन
मग सहजच शब्दात सांडून जातात
तुझा तो अट्टाहास
मला आजही खूप आवडतो
तुझ्या त्या रेशीम बंधांना
माझ्या कवितेत सावडतो
मला आजही खूप आवडतो
तुझ्या त्या रेशीम बंधांना
माझ्या कवितेत सावडतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा