रविवार, ११ डिसेंबर, २०१६

तेव्हा कुठे कविता जुळुन येते....


तु
तुझ्यासाठी
तुला
तुझ्यामुळे
अशा शब्दांखेरीज
जेव्हा शब्दच सुचत नसतात
तेव्हा फक्त आणि फक्त
आठवण सतवत असते
अन त्या आठवणीस
जेव्हा शब्दरुप मिळतात
तेव्हा कुठे कविता जुळुन येते
का तर मी या आठवणी
चिरकाल स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करतो
पण कधी कधी तुझ्या भावनांना
मी माझ्या कवितेत उतरवुच शकलो नाही
कारण तु मला त्या भावना
कधी सांगण्याचा प्रयत्नच केला नाही
अन मी फक्त एक आशा ठेवली तुझ्यावर
तीही तु फक्त माझीच आहेस म्हणुन
पण माहीत नाही तुझ्यात कोणता भाव आहे
आपलच म्हणणं खर ठरवतेस तु
अल्लडपणा तर असा ठासुन भरलाय तुझ्यात
की सांगता सोय नाही
कस सांगावं अन कस वर्णन करावं
हेही कळेना मला आता
फक्त तु भेटलीस
अन दिसलीस जरी
तर कारण मिळत
कविता जुळण्याला

✍✍साहील✍✍
विजय वाठोरे सरसमकर
हिमायतनगर जि.नांदेड
9975593359

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...