शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

उमलती कळी.....

उमलती कळी.....



आहे ती एक
उमलती कळी,
जीच्यामुळे जूळतात
माझ्या कवितेच्या ओळी !

कळी ती माझी
तीच सौंदर्य जणू सुवर्ण,
जीव ओवाळीते माझ्यावर
तीच्याविना तर जीवनच अपुर्ण !

तीला व्यक्त करण्याचा
माझा हा छोटासा प्रयत्न
मोठ्या मुशकीलीन मिळालय
मला हे मौल्यवान अस रत्न

तीची प्रित म्हणजे
प्रेमाच्या गुंत्यात गुंफत जाणार जग
लक्ष खिळवुन ठेवणारी ती
तिच्यातच मी हरवुन जात असतो मग

होत असते नाराज जेव्हा
मग घेवुनी तीचा हातात हात
देवू करतो मी तीला
सदैव जन्मभराची साथ !


                                   विजय वाठोरे सरसमकर
                                   (साहिल )
                                   हिमायतनगर जि.नांदेड
                                   9975593359

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...