बुधवार, १९ एप्रिल, २०१७

*मन* ..


मन मीत माझे
माझ्याशी बोलले
भेद हे खोलले
क्षणातच
क्षणाची विश्रांती
मोहाचीच माया
दावितसे छाया
बदलुन
नाती गोती सारी
मनाची किमया
सर्व मोहमाया
मनाचीच
क्षणार्धात अशी
जागवीतो अाशा
नवी अभिलाशा
हेची मन
मनाची करणी
जीवा लावे गोडी
हवीहवी थोडी
सर्वांनाच
जीवन फुलण्या
देई हेची साथ
संकटाला मात
मन देई
जीवनी आपुल्या
हसु ते खुलवी
क्षणात भुलवी
मनमीत

✍✍विजय वाठोरे सरसमकर
        ( साहिल )
          नांदेड
    9975593359
     12/04/2017

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...