हिमायतनगर तालुक्यामध्ये चिकनगुनियाचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर ; सरसम येथे कंटेनर सर्वे सुरु
महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क
हिमायतनगर (विजय वाठोरे ) - तालुक्यातील मौजे जिरोना या ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गणेशवाडी व तांडा येथे अचानक चिकनगुनिया सदृश्य रुग्ण हे 60 पेक्षा जास्त आढळून आल्याने हिमायतनगर तालुक्यामध्ये या रोगाविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिमायतनगर तालुक्यामध्ये चिकनगुनियाचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आला आहे.या संदर्भात आरोग्य विभागाकडून कंटेनर सर्वे सुरू करण्यात आला आहे. यात नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांचे रक्त तपासणी करणे. पाण्याच्या जागा स्वच्छ करणे, रस्त्यावर वाहणारे पाणी व नाल्याचे पाणी वाहते करण्यास सांगणे. विनाकारण साचून असलेले पाणी त्याची विल्हेवाट लावण्यास आशा सेविका यांच्यामार्फत गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली आशा गटप्रवर्तक पौर्णिमा कांबळे यांच्या सोबत रविकांत माने,भोसले,आशाताई जयमाला कांबळे यांनी सरसम या गावात कंटेनर सर्वे सुरू केला आहे. दूषित पाणी व घाण यातून पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगापासून बचावण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे रक्त तपासणी करत आहेत. गावात ठिकठिकाणी रस्ते घाण झाले आहेत.तिथे पाणी साचले असल्यामुळे मच्छर झाले आहेत,यामुळे नागरिक बिमार पडत आहेत.तसेच सांडपाण्याची विल्हेवाट लावणे, नाल्या साफ करून नाल्याचे पाणी वाहते करणे, टाक्या डबके इत्यादी ठिकाणचे पाणी झाकून ठेवणे किंवा स्वच्छ ठेवणे. तसेच एक दिवस कोरडा पाळणे.याबाबत गावकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा