मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

शब्दांचीच माळ.....



गुंफतो मी आज शब्दांचीच माळ
अशी जुळली माझी शब्दांशीच नाळ

शब्द शब्द जपून मी मांडतो
दररोज उपसत असतो मनातील गाळ

जातीचं सरण लावून राखेचे नदीत केले विसर्जन
जातीवाद्यांविरोधी उन्मळतो मनात जाळ

जीवाची पार काहिली होते रोजच्या घटना पाहून
वाटतं थोरांचे विचारच झाले गहाळ 

                              विजय वाठोरे सरसमकर (साहिल)
                              हिमायतनगर जि.नांदेड

                               9975593359

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...