मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

जाताना ती देवून गेली आठवणींच जहर .......


   जाताना ती देवून गेली आठवणींच जहर  .......


         तो क्षण कधीच न विसरण्यासारखा होता.कारण एका गोड नात्यात दुरावा निर्माण करणारी वेळ होती,अगदीच रडण्यागत झाली होती या मनाची स्थिती.अन सावरल मी  स्व:ताला .पण ती स्वताला सावरू शकली नाही.अचानक पावसाच्या मुसळधार धारा बरसाव्या त्यासम खुप अश्रू बरसवले तिने .बऱ्याच गोष्टी अर्धवट राहिल्या होत्या.ना मी तिला काही सांगितलं मानातल ना तिने मन मोकळ केल.पण प्रेमाची भावना दोन्हीही मनात सारखीच होती.गरज होती ती फक्त एका हाकेची .तेंव्हा माझ्या मनातून फक्त हीच भावना साद घालत होती.

आता मिळालीस समक्ष तर व्यक्तही करू शकत नाही
की तू मला आवडतेस ,
तुझ्या सहवासात असूनही मन काही भरत नाही
प्रत्येक क्षणी तू आणि तूच आठवतेस.   

              आजपर्यन सर्व दिवस असेच गेले ज्यात ती आणि मी अगदीच जवळीकतेणे नांदलो.मी केलेल्या प्रत्येक चुकीला ती हसून सहजच क्षमा करायची.दोघात चालणारी थट्टा,मस्करी दररोजचीच.अन कधीच तिने राग मानला नाही कोणत्याही गोष्टीचा.आज थोड वेगळच होत कारण माझ्या मनातली भावना ओठावर यायला तयार नव्हती .आणि तशी हिम्मतही आता राहिली नाही.तेंव्हा ती काय मनेल याकडेच माझे लक्ष लागून होते.
              आमच्या या मैत्रीच्या नात्यात एवढी जवळीक साधेल अस कधी वाटलच नव्हत.पण तिच्या मनातल्या आवडी-निवडी मी अगोदरपासूनच जाणून होतो . मी हि तिला जे आवडल ते मला न आवडतानाही आवडून घ्यायचो.तिच्या आजपर्यंतच्या सहवासाने मला खूप काही शिकवलं होत .तिनेही माझ्या प्रत्येक आवडीला आपल मानलं होत.पण आज ती तिच्या रडण्यातून मला खूप काहि सांगून गेली.तिच्या मनात असणारी प्रेमाची भावना ती लपवून गेली.
               तिलाही माझ्याशी काहीतरी बोलायचं होत पण ती न बोलताच निघून गेली.पण माझ्या मनात ती प्रेम जागवून गेली. सांगता न येण्यासारख अस काही ती बोलण्याआधीच दुरावली.पण मी मात्र आवडलो होतो तिला हे तिने सिद्धही केल होत.यामुळे तिच्या मनात प्रेम हे होतच.पण तीचाही नाविलाज होता म्हणून ती गेली पुन्हा कधीही न भेटण्यासाठी.....
आता शेवटी मनात एकच भावना उरली होती ......


ती म्हणजे जणू पावसाची कहर
पण कधी-कधी भासते सागराची लहर
आता सुण-सुण वाटत तिच्याविना हे शहर
जाताना ती देवून गेली आठवणींच जहर   
                                 



                                        विजय वाठोरे सरसमकर(साहिल)
                                 ता.हिमायतनगर जि.नांदेड  

                                     ९९७५५९३३५९ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...