🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जिजाऊ पोटी जन्मुनी...हा आ आ आ आ ये
जाहला जो गुणी,
स्वराज्याचा होता जो शिरोमणी
अश्या शिवबांना माझा प्रणाम जी जी जी जी
शहाजीराजांची होता तो जान
ज्याने शून्यातुनी केलं स्वराज्य निर्माण
घेउनी मावळ्यांची साथ
ज्याने शत्रूवर केली मात
अश्या शूर शिवबांना माझा प्रणाम जी जी जी जी जी
कैक आले कैक गेले
शत्रु शिवबांशी जे नडले
बादशहा हाती देउनी तुरी
दरारा जमविला त्याच्या उरी
अश्या लढाऊ शिवरायांना माझा प्रणाम जी जी जी जी जी
अफजलखानाला फाडिले टराटरा
भिवून शाहिस्तेखान पळाला भराभरा
ज्याचे गडकिल्ले साक्षीदार
शोभे ज्याच्या हाती भवानी तलवार
अश्या छत्रपती शिवबांना माझा प्रणाम जी र ह जी जी जी जी
✍विजय वाठोरे सरसमकर
ता.हिमायतनगर जि.नांदेड
9975593359
19/02/2017
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा