आई तुझ्या आशीर्वादाने जीवन माझे उभरते
तुझ्या चरणी मन माझे कृतज्ञतेने भरते
तू दिलास जन्म मजला शतदा तुझा मी ऋणी
तुझ्या विना ग आई यशोगाथा माझी उणी
सांधीवाताचे दुखणे तू कुणालाच सांगत नाहीस
असलीस जरी आजारी तरी राबत राहीस
ठायी ठायी उध्दारिलेस तू जीवन माझे
तुझ्यामुळेच लाभले आनंदाचे क्षण माझे
आई तुझ्या उपकारांचे कसे चुकवू मी मूल्य
उभ्या जिंदगानीत माझ्या मनी हेच शल्य
विजय वाठोरे सरसमकर
......साहिल ..........
ता.हिमायतनगर जि.नांदेड
9975593359
दि :- २४/०२/२०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा