स्वराज्याचे रक्षक शंभुराजे
मर्दानी रुबाब चहुमुलखी गाजे
डोळ्यात तेज,रोमारोमात शोर्य
शिवपुत्र शोभले शंभुराजे
शिवपूत्राचा जन्म जाहला
स्थळ होते किल्ले पुरंदर
शिवरायांचे मिळाले बाळकडू
शंभू बनले धर्मवीर धुरंदर
आई सईबाईंचे जाहले निधन
सांभाळीले राजमाता जिजाऊ
दूध आई बनली त्यांची
कापूरहोळ गावची धाराऊ
शंभू तरबेज झाले डावपेचात
शिकुनि राजकारणातील बारकावे
स्वराज्याचे बनले छत्रपती
राज्याभिषेक झाला शंभूच्या नावे
शत्रुसही त्यांचा वाटत असे हेवा
दाहिदिशात शंभूचा असे गवगवा
शूर,पराक्रमी छत्रपती राजा
पुन्हा जन्मास यावा शिवशंभू छावा
असह्य यातना साहिल्या तरी
सोडली नाही स्वराज्यनिष्ठा
झाले बेहाल देहाचे तरीही
सोडली नाही धर्मनिष्ठा
----------------------------------------------
💫✍विजय वाठोरे ( साहिल )
हिमायतनगर जि.नांदेड
9975593359
email :- vijaywathore0@gmail.com
blog :- sahilwathore.blogspot.com
----------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा