मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०२५

श्री परमेश्वर देवस्थान कमिटीच्या उपाध्यक्षपदी श्रीश्रीमाळ तर सचिव पदी देवकते यांची निवड

 


श्री परमेश्वर देवस्थान कमिटीच्या उपाध्यक्षपदी श्रीश्रीमाळ तर सचिव पदी देवकते यांची निवड

महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज (MPL NEWS )

हिमायतनगर (विजय वाठोरे ) - शहरासह विदर्भ मराठवाडा व तेलंगणा राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट  कमिटीच्या वार्षिक बैठकीत श्री महावीर सेठ श्रीश्रीमाळ यांची पुन्हा उपाध्यक्षपदी फेरनिवड व तसेच श्री अनंतराव देवकते यांची सचिवपदी फेरनिवड करण्यात पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी केली आहे.

 नांदेड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या जागरूक देवस्थान श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या मागील वीस ते पंचवीस वर्षापासून कारभार पाहणारे  उपाध्यक्ष या पदावर कर्तव्यदक्षपणे काम करणारे हिमायतनगर शहरातील प्रसिद्ध व्यापारी तथा जनमानसातील व्यक्तिमत्व महावीर  सेठ श्रीश्रीमाळ व सचिव अनंत मामा देवकते यांची आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी श्री परमेश्वर  मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार  पल्लवी टेमकर यांनी उपाध्यक्षपदी श्रीश्रीमाळ व सचिव पदी देवकते यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल शहरासह तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या निमित्ताने त्यांचे अभिनंदन करून  त्यांना शुभेच्छा देताना माजी नगराध्यक्ष कुणाल  राठोड  यांच्या सह श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे संचालक विठ्ठल शिंदे,सौ लताताई मुलंगे, मथुराबाई भोयर, बनसोडे काका, बल्पेलवार  काका, विलास वानखेडे, संजय माने, गजानन मुत्तलवाड यांच्यासह आदीजन उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जेष्ठ नागरिक संभाजीराव शिंदे पळसपुरकर यांचे निधन

१०५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज नेटवर्क  मुख्य संपादक - विजय वाठोरे सरसमकर  संपादक - लंकेश वाठोरे सरसमकर  ह...