रासायनिक खते व बियाण्याची ज्यादा दराने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकावर कारवाई करा
त्रिरत्नकुमार भवरे यांची लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्या कडे मागणी.
वार्ताहर (पांडुरंग मीराशे ) -खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच हिमायतनगर तालुक्यात डीएपी एरिया रासायनिक खताचा तुटवडा झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले या खताच्या तुटवड्यामुळे पेरणी करिता महागाडी रासायनिक खते शेतकऱ्यांना घ्यावे लागले तर अनेक कृषी सेवा केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांना मुजोरपणा करून बी बियाण्याची ज्यादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्या विरुद्ध जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी विशेष पथक नेमून योग्य चौकशी करून अशा मुजोर व ज्यादा दराने बी बियाणे , रासायनिक खते विकणाऱ्या दुकानदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी श्रीरत्नकुमार भवरे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे आता जिल्हा विशेष भरारी पथक हिमायतनगर तालुक्यासह ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्र चालकावर काय कारवाई करेल याकडे अनेक सुजाण शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच हिमायतनगर तालुक्यात कृषी सेवा केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांना वेटीस धरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. युरिया डीएपी रासायनिक खताचा कृतीम तुटवडा करून महागड्या खतांचा पेरणी करिता शेतकऱ्यांना पुरवठा करण्याची रणनीती दुकानदार युनियनने केल्याचा भास जाणवत होता अनेक कृषी सेवा केंद्र चालकाकडून काही कंपन्यांचे रासायनिक खते बियाणे विक्रीकरिता बंधनकारक असतानाही बुरशीनाशकासह अव्वाच्या स्वभावामध्ये शेतकऱ्यांच्या माती मारल्या गेल्याची खंत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली शेतकऱ्यास मुजुर वृत्ती करून जादा दराने रासायनिक खते बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारावर मात्र भरारी पथकाने मेहेर नजर दाखवल्याचे चित्र पहावयास मिळाले त्यामुळे याबाबतीत उलट सुलट चर्चेला तालुक्यात ऊत आला आहे.
तर काही कृषी सेवा केंद्र चालक तेलंगणा राज्यातील विक्रीसाठी बंधनकारक असलेले बियाणे खते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विक्री करत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे परंतु या बाबतीत भरारी पथक मात्र कुठलीही एकाही दुकानदारावर कार्यवाही केली नसल्यांची खंत सुजान शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवसाढवळ्या बी बियाणे रासायनिक खते यांच्या माध्यमातून लुबाडणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकावर जिल्हाधिकाऱ्यांनी व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी विशेष भरारी पथक नेमून त्यांची चौकशी करावी व चौकशी अंति गुन्हेगार आढळल्यास त्या दुकानदारावर कायदेशीर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी बहुजन युवा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्न कुमार भवरे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा